Headlines

Navnath Ban Targets Rohit Pawar Over MPSC Controversy; Maharashtra News


एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असून, आता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. रोहित पवार यांचा उल्ले

.

‘रोहित पवारांना संविधानाचा अभ्यास नाही’

रोहित पवार यांनी एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष भीमणवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याचा दावा केला होता. याचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले, “रोहित पवार यांना संविधानाचा अजिबात अभ्यास नाही. लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हा राज्यपालांकडे किंवा राष्ट्रपतींकडे द्यावा लागतो, मुख्यमंत्र्यांकडे नाही. रोहित पवार लबाड लांडग्याप्रमाणे वागत असून केवळ अफवा पसरवण्याचे काम करत आहेत.” राज ठाकरे यांनी काल आंदोलनात जाऊन १९५० च्या कायद्याचा संदर्भ देत पवारांचे बिंग फोडले आणि त्यांचे कान टोचले, असेही बन म्हणाले.

‘आजोबांमुळे आमदार झालात’

रोहित पवारांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत बन यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. “रोहित पवार यांचे स्वतःचे काहीही कर्तृत्व नाही. आजोबा मुख्यमंत्री होते म्हणूनच ते आज आमदार झालेत. अन्यथा बारामतीमध्ये रोहित पवारांना कोणी ग्रामपंचायतीचा सदस्य देखील केले नसते,” असा घणाघात त्यांनी केला. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याने पवार हे स्वतःच्या अहंकारापोटी ‘बारामती ॲग्रो’चे कार्यकर्ते आयात करून आंदोलनात बसवत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

‘अदानींचे ड्रायव्हर होताना स्वाभिमान कुठे होता?’

स्वाभिमानाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांना लक्ष करताना बन यांनी थेट गौतम अदानींचा संदर्भ दिला. “तुम्ही कोल्हेकुई करू नका. जेव्हा उद्योगपती गौतम अदानी बारामतीत आले होते, तेव्हा त्यांचे वाहन चालवत तुम्ही एका उद्योगपतीचे ‘ड्रायव्हर’ झाला होतात. तेव्हाच तुम्ही तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला होता,” असा टोला बन यांनी लगावला.

ट्रोल आर्मीसाठी २ कोटींचे बजेट?

सर्वात खळबळजनक दावा करताना नवनाथ बन म्हणाले की, “मला समाजमाध्यमांवर ट्रोल करण्यासाठी रोहित पवारांनी किमान दोन कोटी रुपयांचे बजेट ठेवलेले आहे. पण मी २००४ पासून अभाविप (ABVP) आणि भाजपचा कार्यकर्ता आहे. तुमच्यासारख्या ट्रोलरला आणि टोळधाडीला मी अजिबात घाबरत नाही,” असे त्यांनी सांगितले. या सर्व आरोपांमुळे आता रोहित पवार आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..

MPSC अध्यक्ष भीमनवारांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला: रोहित पवारांचा दावा, म्हणाले- विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता इगोचा खेळ बनला

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेले सत्याग्रह आंदोलन आता अधिकच आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या आंदोलनात एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘भीमनवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असून, आता हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या हिताचा न राहता केवळ मुख्यमंत्र्यांच्या ‘इगो’चा खेळ बनला आहे,’ असा थेट आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.