![]()
तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी करत शुक्रवार ते रविवार दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी पाच दिवसात तापमानात २ ते ४ अंशांदरम्यान वाढ होणार आहे. ४८ तासांत पारा २ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे २९ एप्रिल ते १ मे दरम्यान विदर्भात कोरडे व उष्ण वातावरण राहणार आहे. अकोल्यात तापमानाने यावर्षी सर्व विक्रम तोडले असून एप्रिल महिन्यात देशात सर्वाधिक तापमानाची (४५ अंश) नोंद झाली आहे. बुधवारी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ४४.२ अंश तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भात पुन्हा तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शुक्रवार ते रविवार दरम्यान विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांचे तापमान पुन्हा वाढणार आहे. म्हणजेच अकोल्याचे तापमान आगामी तीन दिवसात ४५ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. २०१९ मध्ये दशकातील सर्वाधिक तापमानाची नोंद शहरात २९ एप्रिल २०१९ रोजी दशकातील सर्वाधिक ४७.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसेच २०२६, २०२७, २०१८ मध्ये ४५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. २०२२ मध्ये ४५.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. तसेच यावर्षी १९ एप्रिल रोजी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश तापमानाची नोंद झालेली आहे.
Source link
पारा 43.7 अंशांवर; उद्यापासून उष्णतेच्या लाटा:आगामी तीन दिवसात अकोल्याचे तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता