Headlines

चोंढी पेट्रोल पंपावरील खून प्रकरण:एका महिलेसह 5 जणांवर खूनाचा गुन्हा दाखल, आरोपींची शोध मोहिम सुरुच




वसमत तालुक्यातील चोंढी येथे इंडियन ऑईलचा पेट्रोलपंप सील करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या विक्री विभागातील व्यवस्थापकावर खंजरने सातवेळा वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांवर बुधवारी ता. ७ कुरुंदा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील चोंढी शिवारात इंडियन ऑईलच्या नांदेड कार्यालयाचे काही अधिकारी व कर्मचारी मंगळवारी ता. ६ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पेट्रेलपंप सील करून ताब्यात घेण्यासाठी आले होते. यामध्ये विक्री व्यवस्थापक महेश शेळके यांचाही समावे्श होता. दुपारपासून पांडववीर कुटुंब व इंडियन ऑईलचे अधिकारी यांच्यात चर्चा सुरु होती. यावेळी पांडववीर यांनी एक महिन्याची मुदत दिल्यानंतर पेट्रोलपंप सुरु करतो असे आश्‍वासन दिले होते. मात्र अधिकारी पेट्रोलपंप सील करून ताब्यात घेण्यावर ठाम होते. यावेळी वाद वाढत गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या उमेश पांडववीर याने मागचा पुढचा विचार न करता महेश शेळके यांच्यावर खंजरने वार करण्यास सुरवात केली. तसेच इतरांनी दगडफेक करून दहशत निर्माण झाली. अचानक झालेल्या या हल्ल्यात महेश यांचा मृत्यू झाला. कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पुरी, उपनिरीक्षक गंधकवाड, यु. यु. कारामुंगे, गुट्टे, जमादार भगीरथ सवंडकर, प्रशांत मुंडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मयत महेश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गुल्लाकंटला मणीप्रसाद यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुरुंदा पोलिसांनी उमेश पांडववीर याच्यासह पाच जणांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत आवश्‍यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी दोन संशयीतांना चैाकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिस उपनिरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांचे पथक रवाना झाले आहे. हेही वाचा.. इंडियन ऑइलच्या व्यवस्थापकाची चाकूने 7 वार करून हत्या:पंप सील करण्याच्या कारवाईदरम्यान वसमत तालुक्यात थरार तीन महिन्यांपासून बंद असलेला इंडियन ऑईलचा पेट्रोलपंप सील करण्यासाठी आलेल्या व्यवस्थापकाचा, पंपमालकाच्या मुलाने चाकूने सात वार करून खून केला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजता वसमत तालुक्यातील चोंढी येथे घडली. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *