एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाने आता राजकीय वळण घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेतील काही त्रु
.
आंदोलनाची जागा आणि याचिकाकर्त्याचे ‘भाजप’ कनेक्शन
आंदोलनामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होत असल्याच्या आरोपांना उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “आमच्याकडे अलका चौक आणि अहिल्या लायब्ररी असे पर्याय होते. पण हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे पुणेकरांना नाहक त्रास झाला असता. म्हणूनच आम्ही एस. एम. जोशी मार्गावर पत्रकार भवनजवळ (स्मशानभूमीची जागा) बसण्याचा निर्णय घेतला, जिथे वाहतूक कमी असते आणि पर्यायी रस्ते उपलब्ध आहेत.”
या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश करताना ते म्हणाले, “हा याचिकाकर्ता पुणे महानगरपालिकेतील भाजपच्या एका प्रमुख नेत्याचा कार्यकर्ता आहे. तो त्या नेत्याचे आर्थिक व्यवहार पाहतो आणि महापालिकेची कामे घेतो. यावरून आंदोलनाला विरोध करणारा हा भाजपचाच कार्यकर्ता असल्याचे सिद्ध झाले आहे.”
पोलिसांना निकाल आधीच माहीत होता का?
उच्च न्यायालयातील सुनावणी आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त करताना रोहित पवार म्हणाले, “हायकोर्टामध्ये आज सकाळी ११ वाजता सुनावणी आहे. सुनावणी अकरा वाजता असतानाही सकाळपासूनच इथे मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा पाठवण्यात आला आहे. मग आम्ही असे समजायचे का, की कोर्टाचा निर्णय सरकारला आणि पोलिसांना आधीच कळलेला आहे?”
MPSC अध्यक्षांना निलंबित करा आणि दडपशाही थांबवा
मुख्यमंत्र्यांना टोला लगावताना पवार म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राला वाचवण्यापेक्षा राज्याचे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्याकडे लक्ष द्यावे.” आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “जर MPSC अध्यक्षांना हटवता येत नसेल, तर त्यांना तत्काळ निलंबित करावे आणि त्या जागी नवीन व प्रामाणिक अधिकारी नियुक्त करावेत,” अशी जोरदार मागणी त्यांनी केली.
तसेच, विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी काही कार्यकर्त्यांचे ट्विटर (X) आणि टेलिग्राम अकाऊंट्स ब्लॉक करण्यात आले असून, पोलिसांच्या माध्यमातून सरकार दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना न्याय न मिळाल्यास आपण त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा ठाम निर्धार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा..
तुझ्या तोंडातला सोन्याचा चमचा शोधतोय: MPSC आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांसाठी वडील राजेंद्र पवारांचे भावनिक पत्र

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आमदार रोहित पवार गेल्या सहा दिवसांपासून एस. एम. जोशी पुलाजवळ विद्यार्थ्यांसोबत ठिय्या आंदोलन करत आहेत. दिवस-रात्र आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवत असल्याने त्यांच्या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. विरोधकांकडून त्यांच्या आंदोलनावर टीका होत असतानाच आता रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी मुलाच्या भूमिकेला पाठिंबा देणारे भावनिक पत्र लिहिले आहे. सविस्तर वाचा