![]()
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जाहीर करण्यात आलेले स्वतंत्र कल्याणकारी मंडळ गेल्या १४ ते १५ महिन्यांपासून कार्यान्वित झाले नसल्याने राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली आहे. हे मंडळ तातडीने कार्यान्वित करावे, अशी मागण
.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची घोषणा केली होती. या घोषणेमुळे राज्यभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, घोषणेनंतर १४ ते १५ दिवस उलटूनही वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित झाले नसल्याने विक्रेत्यांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात श्रीकांत भारती यांनी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर माहिती व जनसंपर्कमंत्री आशिष शेलार यांनी पुढील अधिवेशनापूर्वी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न लक्षात घेऊन हे मंडळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याच्या मागणीचे निवेदन पंढरपूरचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रि यांना देण्यात आले. यावेळी जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते शेखर तेंडुलकर, आनंद तेंडुलकर, उमेश फावडे, संजय दहिहंडे उपस्थित होते.