“ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने केवळ मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत मराठी माणसाचा जो स्वाभिमान आणि ताठ कणा होता, तो आज हरपला आहे. दुष्काळात नान
.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रवीण दरेकर यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला. त्याच वेळी, दिल्लीतील काँग्रेसचे आंदोलन, ईव्हीएम-बॅलेटचा वाद, मुंबई उच्च न्यायालयाचे ताजे निर्देश आणि पुण्यात आमदार रोहित पवार यांच्याकडून सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
नानांचा तो रुबाब कायम स्मरणात राहील
नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि भेटीचा प्रसंग सांगताना प्रवीण दरेकर म्हणाले, “नानांचा अभिनय अप्रतिम होता. त्यांच्या आवाजातील भारदस्तपणा, सहजता आणि दिलखुलास वृत्ती सर्वांना भुरळ पाडणारी होती. ‘पुरुष’ नाटकात नानांचे चालणे-बोलणे आणि तो दरारा मी प्रत्यक्ष पाहिला आहे. स्वतःच्या अटींवर, अत्यंत रुबाबात जगणारा आणि कोणाचीही तमा न बाळगता मनात येईल ते स्पष्टपणे बोलणारा असा हा अवलिया होता.”
ऑर्चिड हॉटेलमधील ती अखेरची भेट
“अवघ्या दोन महिन्यांपूर्वी ऑर्चिड हॉटेलमध्ये नानांची अनपेक्षित भेट झाली होती. त्यांनी त्यांच्या खास शैलीत माझ्या पोटात हळूच गुच्चा मारला आणि म्हणाले, ‘चांगलं चाललंय तुझं!’ इतका उत्तुंग अभिनेता असूनही त्यांच्यात काडीचाही गर्व किंवा अहंकार नव्हता; अत्यंत साधे आणि सरळ व्यक्तिमत्त्व होते.”
‘नाम’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ
“राज्यात जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला, तेव्हा नाना अस्वस्थ झाले. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून पाणी साठवणूक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात नाना नेहमी पुढे असायचे. इतर अभिनेत्यांपेक्षा त्यांच्याकडे समाजाविषयी अथांग संवेदनशीलता होती. त्यांच्या जाण्याने बळीराजाचा मोठा आधार हरपला आहे.”
‘मोकाट ढोरा’सारखे वागणे बंद करा!
पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा संदर्भ देत दरेकर यांनी रोहित पवारांना चांगलेच फटकारले. “उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की आंदोलनांमुळे सामान्य नागरिकांचे रस्ते अडवले जाऊ नयेत. तसेच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासाला लागावे. तरीही रोहित पवार अजूनही विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून रस्ते अडवण्याचा हट्ट करत आहेत. पुणे शहर बंद करायला ही काय तुमच्या बापाची जहागिरी आहे का? हे विद्यार्थी काय तुमच्या घरची मालकी आहेत का?”
आजोबांकडून थोडेतरी सामंजस्य शिका
“सुसंस्कृत महाराष्ट्रात असा पोरकटपणा आणि अचरटपणा करून कोणी नेता होत नाही. संकटसमयी आणि जनहिताच्या वेळी राजकारण बाजूला ठेवून सामंजस्याची भूमिका कशी घ्यावी, हे रोहित पवारांनी आपल्या आजोबांकडून (शरद पवार) थोडे तरी शिकावे. ज्याप्रमाणे मोकाट ढोराला कोणतेही वेसण नसते, तसे रोहित पवार सध्या राजकारणात मोकाट सुटले आहेत. स्वतःचे राजकीय अस्तित्व संपल्याने ते दुसऱ्यांच्या आंदोलनावर स्वार होऊन राजकीय पोळी भाजत आहेत.”
उद्या करिअर उद्ध्वस्त झाल्यास जबाबदारी घेणार का?
“विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास त्यांचे करिअर धोक्यात येईल, याची जराही चाड रोहित पवारांना नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून सर्व रास्त मागण्या तत्काळ मान्य केल्या आहेत. झोपलेल्याला जागे करता येते, पण रोहित पवारांनी झोपेचे सोंग घेतले आहे; या सोंगाड्याला कोण जागे करणार?” असा सवाल त्यांनी केला.
त्रिपुरात बॅलेटवर 94% जागा जिंकून जनतेने विरोधकांचे थोबाड रंगवले!
विरोधकांच्या ‘ईव्हीएम हटाव, बॅलेट आणा’ या मोहिमेची त्यांनी आकडेवारीनिशी हवा काढली. “दिल्लीत बॅरिकेड्सवर चढून नौटंकी करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाला देशात कवडीचाही जनाधार उरलेला नाही. जनाधार नसल्याच्या वैफल्यातून ते देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला, मग ज्ञानेश कुमारांचा मागितला, आता एमपीएससीच्या अध्यक्षांचा मागतायत; नेमके काय हवे आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक नाही.”
बॅलेट पेपरवरही भाजपचा ऐतिहासिक विजय
“ईव्हीएमवर संशय घेऊन बॅलेट पेपरची मागणी करणाऱ्या विरोधकांना जनतेने चोख उत्तर दिले आहे. नुकत्याच आसाम आणि त्रिपुरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे ‘बॅलेट पेपर’वर पार पडल्या. तिथे एनडीए आणि भाजपने तब्बल 94 टक्के जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांचे अक्षरशः थोबाड रंगवले आहे. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”
हर्षवर्धन सपकाळ कोण?; रस्त्यावर 10 लोकांना विचारले तरी ओळखणार नाहीत!
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा दिलेल्या इशाऱ्यावर दरेकर यांनी जोरदार खिल्ली उडवली. “कोण हर्षवर्धन सपकाळ? रस्त्यावर चालणाऱ्या 10 सामान्य लोकांना विचारले तरी त्यांना सपकाळ कोण हे ठाऊक नाही. ज्यांचे स्वतःचे अस्तित्व राज्यात शून्य आहे, अशा अदखलपात्र नेत्यांच्या फुसक्या इशाऱ्यांची दखल घ्यायला भाजप मोकळा नाही,” असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला.
——————————————————
हेही वाचा…
राहुल गांधींकडून आंदोलनांच्या नावाखाली दिल्लीत अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न: आसाममध्ये बॅलेट पेपरवरील निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ- बन

संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची प्रवक्तेगिरी करणे बंद करावे. काल ज्या पद्धतीने दिल्लीतील रस्त्यावर राहुल गांधींनी गोंधळ घातला. राहुल गांधी, प्रियांका गांधींकडून महिला पोलिस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करतानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. राहुल गांधींच्या आंदोलनातून दिल्लीत अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, आंदोलनाच्या नावाखाली कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणं हेच काँग्रेसचं राजकारण आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी