![]()
हिंगोली तालु्क्यातील आमला पाटी तसेच औंढा तालुक्यातील जामगव्हाण शिवारात अवैध वाळू व मुरूम वाहतूक करणारी तीन वाहने पोलिसांच्या पथकाने पकडली आहेत. यामध्ये ४१.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी गुरुवारी ता. ८ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू व मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करण्याचे प्रकार रोखण्यासाठी महसूल व पोलिस विभागाची पथके स्थापन करण्यात आली आहेत. या शिवाय गाव पातळीवर पोलिस पाटील यांच्याकडून अवैध वाळू व मुरुम वाहतुकीची माहिती घेतली जात आहे. जिल्हयात स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस नियंत्रण कक्षाचे पथक स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान, हिंगोली तालुक्यातील आमला शिवारातून एका ट्रॅक्टरमधून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्या पथकाने बुधवारी ता. ७ आमला पाटी येथे एक ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात वैभव जाधव याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार शिवदर्शन खांडेकर पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण ते पिंपळदरी मार्गावर दोन हायवा मधून अवैधरित्या मुरुम वाहतुक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक निरदोडे यांच्या पथकाने गुरुवारी ता. ८ मध्यरात्री या भागात वाहनांची तपासणी ेकेली. यावेळी चालकांकडे मुरुम वाहतुकीचा परवाना नसल्याचे दिसून आले. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक निरदोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी नितीश यादव (रा. जसपूर झारखंड), अभिषेक यादव(रा. बनसानी गडवा, झारखंड) यांच्यासह आॅरकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनेमध्ये पोलिसांनी ४१.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दूस पुढील तपास करीत आहेत. हेही वाचा.. हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई:पाच जणांवर गुन्हा, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त हिंगोली शहरात तसेच लगतच्या नवीन वसाहतीमध्ये अवैधरित्या फटाके साठवून ठेवलेल्या पाच गोदामांवर छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 3 लाख रुपयांचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर हिंगोली शहर तर एका जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा
Source link
हिंगोलीत अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई:2 हायवा, ट्रॅक्टरसह 41.55 लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांवर गुन्हा दाखल