“ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे अचानक आपल्यातून निघून जाणे ही केवळ चित्रपटसृष्टीचीच नव्हे, तर देश-विदेशातील प्रत्येक मराठी माणसाची आणि शेतकरी-शेतमजुरांची भरून न येणारी वैयक्तिक हानी आहे. नाना पाटेकर हे केवळ पडद्यावरचे अभिनेते नव्हते, तर त्यांनी मह
.
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या गेल्या 15 वर्षांतील ऋणानुबंधांना उजाळा दिला. शेती, ग्रामीण विकास आणि ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून उभा राहिलेला सामाजिक लढा यावर बोलताना बावनकुळे स्तब्ध झाले.
मोठ्या भावाची भूमिका पार पाडली; ‘बळीराजा शेत रस्त्यां’चे झाले होते ब्रँड ॲम्बेसेडर
नाना पाटेकर यांच्याशी असलेल्या कौटुंबिक आणि शासकीय सहकार्याचा उल्लेख करताना बावनकुळे म्हणाले, “नानांनी मला कायम लहान भाऊ मानून मार्गदर्शन केले. 2014 ते 2019 या काळात मी ऊर्जामंत्री असताना ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पोहोचली नव्हती, तिथे वीजजोडण्या देण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘जलयुक्त शिवार’ योजनेत ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून पाणी साठवणुकीसाठी त्यांनी संपूर्ण राज्यभर स्वतःच्या यंत्रणेसह योगदान दिले.”
याच महिन्यात शेतकरी दौऱ्याचे नियोजन होते
“मागच्या वर्षी गणपती दर्शनादरम्यान आणि नुकतेच काही दिवसांपूर्वी माझी त्यांच्याशी भेट झाली होती. मी त्यांना ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजने’चे ब्रँड ॲम्बेसेडर होण्याची विनंती केली होती, ती त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मान्य केली. ‘दुष्काळात शेतातील पाणंद रस्त्यांची कामे हाती घेतली पाहिजेत, मला प्रत्येक भागात बोलवा, मी शेतकऱ्यांशी स्वतः चर्चा करेन आणि मोठी मोहीम उभी करू,’ असा निर्धार त्यांनी मागच्या आठवड्यात फोनवर बोलून दाखवला होता.”
नानांची नाळ मातीशी जोडलेली; शेतातच बांधले होते घर
नाना पाटेकर यांच्या ग्रामीण संवेदनशीलतेवर भाष्य करताना महसूलमंत्र्यांनी सांगितले, “नानांचा जन्म मातीतून झाला होता आणि त्यांची नाळ कायम बळीराजाशी जोडलेली राहिली. त्यांनी स्वतःचे घरही शेतात बांधले होते. महाराष्ट्रात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे अश्रू पुसणे, शेतमजुरांना आधार देणे आणि जलसंधारणाच्या कामांना गती देणे हाच त्यांचा मुख्य ध्यास होता. केवळ अभिनय किंवा व्यवसाय म्हणून न जगता, ‘या महाराष्ट्राने मला जन्म दिला, मी या महाराष्ट्राला काय देऊ शकतो?’ हा विचार त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि जगण्यात दिसायचा.”
“महाराष्ट्रात शेतीचा विस्तार कसा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आधुनिक शेतीचे शिक्षण कसे मिळावे, यासाठी पुण्यात एक स्वतंत्र कृषी विद्यापीठ (ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी) उभारण्याचा त्यांचा मानस होता. यासाठी त्यांनी शासनाकडे जागेची मागणी केली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर झाला होता. मात्र, हे काम पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.”
कालपर्यंत ठणठणीत असलेला हिरा असा अकस्मात जावा? विश्वास बसत नाही
नानांच्या आकस्मिक जाण्यावर आश्चर्य व्यक्त करताना बावनकुळे म्हणाले, “कालपर्यंत नाना पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होते. कोणतीही पूर्वसूचना नसताना, कोणताही आजार नसताना असा एका क्षणात हा हिरा आपल्यातून निघून जाईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. हा धक्का पचवणे अत्यंत कठीण आहे.”
शासकीय इतमामात अंत्यसंस्काराबाबत निर्णय
नाना पाटेकर यांच्या अंत्यसंस्काराबाबत विचारले असता ते म्हणाले, “नानांचे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी असलेले योगदान अथांग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत संवेदनशील नेते आहेत. नानांच्या पार्थिवावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय तत्काळ घेतील.”
“नाना पाटेकर आज आपल्यात नसले तरी त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी उभारलेले कार्य, नाम फाउंडेशनचा वसा आणि त्यांचा मुलगा मल्हार व कुटुंब हे कार्य अविरत पुढे चालू ठेवेल. संपूर्ण महाराष्ट्र सरकार आणि राज्य या दुःखाच्या प्रसंगी पाटेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी नमूद केले.
——————————————————–
हेही वाचा…
दीड दिवसापूर्वीच फोन, तो निघून गेला यावर विश्वासच बसत नाही:नाना म्हणजे स्वतःला सतत तासणारा गुणी कलावंत, अमोल पालेकर भावुक

“दीड दिवसापूर्वीच त्याचा फोन आला होता… माझ्या नवीन नाटकाच्या प्रयोगाला येऊ शकलो नाही म्हणून ‘पुढच्या प्रयोगाला नक्की येईन रे’ असे हक्काने सांगणारा माझा धाकटा भाऊ आज अचानक निघून गेला, या धक्क्यातून मी अजूनही सावरू शकलेलो नाही. सकाळी जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा संपूर्ण शरीर सुन्न झाले. अत्यंत बलदंड, रोज नियमित व्यायाम करणारा आणि तब्येतीची काटेकोर काळजी घेणारा माणूस इतक्या अचानक आपल्यातून निघून जाईल, यावर मन विश्वासच ठेवायला तयार नाही,” अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी