Headlines

नाना पाटेकर स्वतःला शिवसैनिक मानत असत:मराठी माणसाचा स्वाभिमान-'नाम'च्या माध्यमातून शेतकर्यांसाठी झटणारा सच्चा माणूस हरपला-संजय राऊत




नाना पाटेकर यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील वावर दमदार मराठी माणूस म्हणूनच राहिला. मराठी माणूस काय आहे, स्वाभिमानाच्या दृष्टीने किती संवेदनशील आहे हे त्यांनी दाखवून दिले. नाना पाटेकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते फार जिव्हाळ्याचे होते. हे मी स्वत: पाहिले आहे. नाना पाटेकर स्वत:ला त्यावेळी शिवसैनिक म्हणून घेत होते, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, मराठी माणसांच्या आंदोलनाला त्यांचा पाठिंबा होता. नानांनी त्यांचे उर्वरित आयुष्य मुंबईसोडून पुण्यात घालवायचे हे ठरवले होते. ते उत्तम मित्र होते. सर्वच राजकीय पक्षात त्यांचा वावर होता. ते अनेकदा नेत्यांना खडेबोल सुद्धा सुनावत होते. आपण समाजासाठी काही तरी देणं लागतो हे नामच्या माध्यमातून दिसून आले. नानांचे जाणं हे महाराष्ट्रासाठी चटका लावणारे आहे. माझ्या आजारपणात नाना मला फोन करत धीर देत होते. शिवसेना परिवारावर त्यांचे विशेष प्रेम होते. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कलाकार म्हणून चांगली मैत्री होती. बाळासाहेब ठाकरेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध संजय राऊत म्हणाले की, नाना पाटेकर यांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. एकदा बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर चिडले त्यावेळी ते मातोश्रीवर आले आणि तुम्ही माझ्या वडीलांसारखे आहात तुम्ही माझ्यावर चिडू शकतात असे म्हटल्याचे मी स्वत: अनुभवले आहे. नानांनी कायम आपली मते परखडपणे मांडली संजय राऊत म्हणाले की, नाना पाटेकर यांनी अनेक राजकीय मते व्यक्त केली आहेत. नाना इतर नेत्याप्रमाणे कधी गप्प बसले नाही. त्यांना जी गोष्ट पटली नाही ती गोष्ट त्यांनी परखडपणे बोलून दाखवली आहे. आपण समाजाचे देणं लागतो म्हणून त्यांनी कायम आपली मते व्यक्त केली आहेत. पण खऱ्या आयुष्यात ‘नायक’ संजय राऊत म्हणाले की, नानांनी खलनायक म्हणून भूमिका साकारल्या असल्या तरी ते खऱ्या आयुष्यात नायक होते. हिंमत असेल तर मारा हा नानांचा डायलॉग बाळासाहेब अनेक वेळा सर्वांसमोर बोलून दाखवत असत. नाना पाटेकर यांचे असे सोडून जाणं हे सर्वांसाठी मोठा धक्कादायक आहे. एक अभिनेता म्हणून ते मोठेच होते पण एक माणूस म्हणूनही त्यांनी खूप मोठे काम केले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी खूप मोठे आणि चांगले काम केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *