![]()
सायकलिंग, धावणे, ट्रेकिंग, कयाकिंग आणि दिशादर्शन अशा विविध साहसी क्रीडाप्रकारांचा थरार अनुभवण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. लाइफफिट स्पोर्ट्झ आणि कॅश्युरिनातर्फे आयोजित ‘कॅश्युरिना अॅडव्हेंचर एक्स २.०’ ही साहसी शर्यत २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसरात होणार आहे. या स्पर्धेत विविध प्रकारांतील विजेत्यांना सुमारे चार लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेची माहिती शनिवारी (१० ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी अभिनेते सचिन खेडेकर, प्रसिद्ध गिर्यारोहक उमेश झिरपे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक हनुमंत हेडे, गंगोत्री होम्सचे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे आणि लाइफफिट स्पोर्ट्झचे संस्थापक संचालक महेंद्र लोकरे उपस्थित होते. ‘ही केवळ शर्यत नाही, एक साहसी मोहीम आहे!’ या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचे मुख्य आकर्षण १२० किलोमीटरची ‘सह्याद्री एक्स्पेडिशन’ हे आहे. या मोहिमेसाठी २४ तासांची मर्यादा असून सहभागी संघांना नकाशा आणि होकायंत्राच्या मदतीने मार्गावरील विविध ठिकाणे शोधावी लागतील. शारीरिक क्षमता, निर्णयक्षमता, दिशादर्शन आणि संघभावनेची या मोहिमेत कसोटी लागणार आहे. या स्पर्धेत ७५ किलोमीटरची सह्याद्री एन्ड्युरन्स चॅलेंज आणि ५० किलोमीटरची भाटघर बॅकवॉटर सायकलिंग चॅलेंज या प्रकारांचाही समावेश आहे. २९ नोव्हेंबरला ५५ किलोमीटरची ऑलिम्पिक ड्युएथलॉन, २५ किलोमीटरची राजगड फोर्ट चॅलेंज आणि १० किलोमीटरची कॅश्युरिना ट्रेल रन होईल. पात्र चार सदस्यांच्या प्रीमियर संघाला २०२७ च्या भारतीय अॅडव्हेंचर रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची पात्रता मिळविण्याची संधी असेल. स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना पदके दिली जाणार आहेत. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी ८०८७६०८३२६ किंवा ९६२३५१९१९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
Source link
सह्याद्रीत 120 किलोमीटरची साहसी शर्यत:कॅश्युरिना अॅडव्हेंचर एक्स 2.0 चे 28 व 29 नोव्हेंबरला आयोजन; चार लाखांची पारितोषिके