Headlines

यवतमाळनंतर अकोल्यातही 1,101 बनावट जन्म दाखल्यांचे रॅकेट:मोहाळे बंधूंवर गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत होणार चौकशी, एसआयटी अहवालानंतर कारवाई



यवतमाळ जिल्ह्यात २७ हजार बनावट नोंदी आढळल्याची घटना ताजी असताना आता अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील आलेगाव येथे बनावट जन्म दाखल्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालात गंभीर

.

एका वर्षात १,१०१ बोगस दाखले देऊन जमवलेल्या काळ्या पैशांतून मोहाळे बंधूंनी गावात ६० लाख रुपयांचा आलिशान बंगला उभारल्याचा आरोप आमदार रणधीर सावरकर यांनी केला. १,१०१ बोगस दाखल्यांतील ८०० नावे ही एका विशिष्ट समाजातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले.या घोटाळ्याचे धागेदोरे शोधण्यासाठी हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या बनावट जन्म दाखल्यांचा गैरवापर करून परदेशी नागरिकांनी बेकायदा भारतीय नागरिकत्व मिळवले आहे का, या अत्यंत संवेदनशील अंगानेही तपास यंत्रणा तपास करत आहेत.

यवतमाळमध्ये २७ हजार बोगस नोंदी आढळल्या होत्या

यवतमाळमधील महागाव आणि आर्णी तालुक्यात गतवर्षी २७ हजार बनावट नोंदी आढळल्या होत्या. त्या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ७ जणांना अटक करण्यात आली होती. त्याच धर्तीवर अकोल्यातील या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा तपास अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

गोळेगावचे स्वतंत्र पोर्टल, तरीही आलेगावातून दाख

आलेगाव व गोळेगाव या गावांमध्ये केवळ २ किलोमीटरचे अंतर आहे. गोळेगावचे स्वतंत्र पोर्टल असतानाही नियमबाह्य पद्धतीने आलेगावातून हे दाखले जारी केले. तत्कालीन ग्रामसेवकांनी यावर अनवधानाने स्वाक्षऱ्या केल्या की हा पूर्वनियोजित कट होता, याचा शोध तसेच संगणक चालक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *