Headlines

Rebels attack in Manipur, 10 people including a woman killed, 14 houses also burnt, more than 40 people killed in Kuki-Naga violence since February


  • Marathi News
  • National
  • Rebels Attack In Manipur, 10 People Including A Woman Killed, 14 Houses Also Burnt, More Than 40 People Killed In Kuki Naga Violence Since February

सत्यनारायण मिश्र | कम्जोंग5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यातील कम्जोंग आणि उखरुलमध्ये सशस्त्र गटांमधील चकमकीत चोवीस तासांत एका महिलेसह १० जणांची हत्या करण्यात आली. यात ६ नागा, ३ कुकी आणि १ नेपाळी नागरिकाचा समावेश आहे.

हा हल्ला म्यानमार सीमेवरून घुसलेल्या १०-१२ नागा बंडखोरांनी शनिवारी पहाटे ४:४० वाजता कम्जोंग जिल्ह्यातील कुकी बहुल चसाड गावात केला. त्यावेळी नागरी पोलिस, आयआरबी आणि बीएसएफचे जवान चसाड ठाण्याजवळ कुकी बंडखोरांचे बेकायदा बंकर उद्ध्वस्त करत होते. त्याच वेळी सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.

या संघर्षात २२ वर्षीय तरुण आणि ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. म्यानमारची बंडखोर संघटना कुकी नॅशनल आर्मी-बर्मा (केएनए-बी) चे तीन कॅडरही मारले गेले, तर तीन जण जखमी झाले. यानंतर कुकी आणि नागा सशस्त्र गटांमध्ये गोळीबार सुरू झाला. चसाड येथील पोलिस ठाण्याला आग लावली गेली. यादरम्यान कुकी आणि नागा समुदायांची १२ घरे जाळण्यात आली.

व्हिलेज डिफेंडरचे शिर धडावेगळे केले

मकुई अशांग आणि टापोन गावाच्या आसपास १०० सशस्त्र बंडखोरांनी वेढा घातला होता. हे लोक केएनएफ-पी, केएनएफ-एन आणि केआरए संघटनांशी जोडलेले असल्याचे सांगितले जाते. स्थानिक लोकांच्या मते, हल्लेखोरांनी ४ नागा व्हिलेज डिफेंडर्सवर गोळ्या झाडल्या. यापैकी आर. अजिन (अजिंपोऊ रिंग्कांगमेई) नावाच्या नागा व्हिलेज डिफेंडरच्या डोक्यात गोळी मारून शिर धडावेगळे केले. मात्र, सरकारी सूत्रांनी याला दुजोरा दिलेला नाही. या वर्षी फेब्रुवारीमध्ये कुकी आणि नागा समुदायांमध्ये हिंसाचार सुरू झाल्यापासून ४० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि डझनभर घरे जाळण्यात आली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *