![]()
पत्रकारांवरील हल्ले, धमकावणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांना लक्ष्य करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध पत्रकार संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला झालेली मारहाण तसेच वृत्तवाहिनीच्या संपादिका वृषाली कदम यांना सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रोलिंगप्रकरणी पत्रकार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेकदा विविध अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, पत्रकारांना मारहाण करणे, त्यांना धमकावणे किंवा सोशल मीडियावर वैयक्तिक पातळीवर लक्ष्य करणे, असे प्रकार लोकशाही व्यवस्थेसाठी चिंताजनक आहेत. पत्रकारांना त्यांचे काम निर्भयपणे आणि स्वतंत्रपणे करता यावे, यासाठी अशा घटनांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका पत्रकार संघटनांनी मांडली. पत्रकार संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला झालेली मारहाण आणि संपादिका वृषाली कदम यांच्याविरोधात सोशल मीडियावर करण्यात आलेल्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. वृषाली कदम यांना पाठिंबा दर्शविण्यासह पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सरकारसमोर मांडण्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त राही भिडे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, पांडुरंग म्हस्के, मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष किरण जोशी यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने पत्रकारांवरील हल्ले आणि सोशल मीडियावरून पत्रकारांना लक्ष्य करण्याच्या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा घटक असून, समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी तो पार पाडत असतो. अशा परिस्थितीत पत्रकारांना त्यांच्या कामामुळे मारहाण किंवा धमक्यांना सामोरे जावे लागणे, तसेच सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात ट्रोलिंग करून त्यांना लक्ष्य करणे, ही गंभीर बाब असल्याचे पत्रकार संघटनांनी निवेदनातून अधोरेखित केले. पत्रकारांना त्यांचे कर्तव्य बजावताना कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा दहशतीला सामोरे जावे लागू नये, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली. पत्रकारांवरील हल्ले आणि ऑनलाइन माध्यमांतून होणाऱ्या लक्ष्यीकरणाच्या घटनांमध्ये संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिका पत्रकार संघटनांनी मांडली. मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आश्वासन पत्रकार संघटनांच्या शिष्टमंडळाने मांडलेल्या मागण्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला झालेली मारहाण आणि संपादिका वृषाली कदम यांच्या ट्रोलिंगप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा आणि पत्रकारांना निर्भयपणे काम करता येण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पत्रकारांवरील हल्ले रोखणे, त्यांना धमकावण्याच्या प्रकारांना आळा घालणे आणि सोशल मीडियावरून होणाऱ्या लक्ष्यीकरणाविरोधात प्रभावी कारवाई करणे, ही पत्रकार संघटनांची प्रमुख मागणी आहे. या प्रकरणात शासनाकडून दिलेल्या आश्वासनानुसार पुढील कारवाई कशी होते, याकडे पत्रकारिता क्षेत्राचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… बारामतीत सुनेत्रा पवारांचा मोठा राजकीय विजय:युगेंद्र पवारांच्या पॅनेलचा सुपडा साफ, सोमेश्वर कारखान्याच्या 21 पैकी 21 जागा जिंकल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने एकतर्फी बाजी मारली. युगेंद्र पवार यांच्या पॅनेलसह पुरुषोत्तम जगताप यांच्या गटालाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे बारामतीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…
Source link
पत्रकारांवरील हल्ले, ट्रोलिंगप्रकरणी कठोर कारवाई करा:विविध पत्रकार संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी