Headlines

ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी तिवस्यात युवक काँग्रेसचा चक्काजाम:एसआयआर प्रक्रियेतील कथित घोळाचा निषेध, वाहतूक तासभर ठप्प




तिवसा येथे मंगळवारी दुपारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन झाले. राज्यातील एसआयआर (मतदार यादीचे सूक्ष्म पुनरीक्षण) प्रक्रियेतील कथित अनियमिततेचा निषेध म्हणून युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. यामुळे तासभर महामार्ग रोखण्यात आला, वाहतूक ठप्प झाली. आंदोलकांनी आरोप केला की, काही राज्यांमध्ये एसआयआरमधील अनियमिततेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पात्र मतदारांना हेतुपुरस्सर मतदानापासून वंचित ठेवण्यात आले. हेच षडयंत्र महाराष्ट्रातही राबवले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये मतदारांचा मतदानाचा हक्क हिरावला जाईल, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी झाली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे, तालुका अध्यक्ष वैभव वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *