![]()
क्रांतीदर्शी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५८ वा पुण्यतिथी महोत्सव २४ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथे आयोजित केला आहे. या आठ दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होतील. यात ३० ऑक्टोबर रोजी होणारी ऐतिहासिक मौन श्रद्धांजली हा मुख्य कार्यक्रम असेल. अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाने या महोत्सवाचे नियोजन केले आहे. त्यासाठी अनेक समित्याही तयार केल्या आहेत. या महोत्सवासाठी विविध धार्मिक संस्थांचे प्रमुख आणि राजकीय नेते यांना निमंत्रित केले आहे. महोत्सवात दररोज सामुदायिक ध्यान, प्रार्थना, ग्रामसफाई, ग्रामगीता प्रवचन, कीर्तन, भजन, योगासन शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश आहे. महोत्सवाची सुरुवात २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ४ वाजता तिर्थस्थापना आणि संत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीच्या पूजनाने होईल. त्यानंतर ध्वजारोहण आणि राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येईल.
Source link
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 58 वा पुण्यतिथी महोत्सव 24 ऑक्टोबरपासून:गुरुकुंज आश्रमात; 30 ऑक्टोबरला ऐतिहासिक मौन श्रद्धांजली