Headlines

प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांचा सहसंचालक कार्यालयाला घेराव:अमरावतीत दोन तास ठिय्या आंदोलन, शासनाला निवेदन सादर




अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने अमरावतीत उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला घेराव घातला. प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. सहसंचालक डॉ. अभय खांबोरकर यांना शासनाच्या नावाने निवेदन देण्यात आले. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्राध्यापक यात सहभागी होते. शिक्षक पदांचे संरक्षण, तातडीची पदभरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कार्यभार निश्चिती, पदोन्नती, जुनी पेन्शन योजना, प्रोत्साहनपर वेतनवाढ, विद्यापीठांतील पदभरती या प्रमुख मागण्या होत्या. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांवर शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी केली. प्रा. प्रदीप खेडकर, डॉ. दिलीप अर्जुने यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. मीनल भोंडे आणि प्रा. डॉ. मंगेश अडगोकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यात ४०० हून अधिक प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *