Headlines

अमरावती-यवतमाळ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले:समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या रस्त्यासाठी नागरिकांचे गडकरींना साकडे, आंदोलनाची तयारी




अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक १४ च्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. समृद्धी महामार्गाशी थेट जोडणी असलेल्या या रस्त्यासाठी आता जिल्ह्यातील नागरिक पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. हा महामार्ग महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असून, उत्तर व दक्षिण कॉरिडॉरला जोडतो. गडकरींनी या कामाला यापूर्वीच मान्यता दिली होती, पण काम सुरू झाले नाही. त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. धारणी तालुक्यातील भोकरबर्डीपासून यवतमाळमधील नेर परसोपंतपर्यंत हा मार्ग सिमेंटचा आणि चौपदरी असावा, अशी मागणी आहे. हा प्रस्ताव गडकरी यांच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) ८४.३० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार केला आहे. प्रशासकीय मंजुरीअभावी काम थांबले असून, यामुळे वाहतुकीची समस्या वाढत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *