मुक्ताईनगरचे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर आणि त्यांच्या मुलीविषयीच्या मुद्द्यावर संताप व्यक्त करत, निखिलने आत्महत्या क
.
दरम्यान यावर उत्तर देताना खडसे म्हणाले की, आमदार चंद्रकांत पाटील यांचे वडील हवालदार असताना मी तरुण होतो मलाही त्याच्या पिढीबद्दल माहिती आहे पण मी बोलणार नाही. ते बोलले तर मलाही बोलावे लागेल, असा इशारा खडसेंनी दिला आहे.
नेमके पाटील काय म्हणाले?
एकनाथ खडसे यांच्या घरात ज्यावेळी मी बघायला लागेल ना त्या दिवशी निखीलने का आत्महत्या केली याचा मी गौप्यस्फोट केला तर खडसेंना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे एका मंत्र्यांने सांगितले होते. राज्याच्या जबाबदार मंत्र्यांना असे बोलावे लागले नेमके निखिलने काय पाहिले होते? तो प्रकार काय होता. आम्ही कुटुंबात घुसायला गेलो तर खूप काही निघेल पण आमची ती संस्कृती नाही. लोकांना ते आवडत पण नाही, असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
गद्दारी काय हे खडसेंनी सांगू नये- पाटील
आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, गद्दारी काय आहे सर्वांना माहिती आहे, कोणत्या पक्षात असताना तुम्ही लोकसभेला कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा असे सांगितले हे सर्वांना माहिती आहे. सत्तेसाठी वरती जात पाया पडणारा आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारे तुम्ही आहात. मी खानदानी माणूस आहे लक्षात ठेवा.
त्यावेळी मी बाहेरगावी होतो- खडसे
एकनाथ खडसे म्हणाले की, निखील भाऊंचा मृत्यू झाला त्यावेळी दोन दिवस आधीपासूनच मी बाहेरगावी होतो. मी दौऱ्यावर असताना मला ही बातमी समजली. पोलिसांनी दिलेले काही रिपोर्ट आमदार पाटील यांना शंका असेल तर सत्ताधारी पक्षाला विनंती करत निखीलभाऊंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करावी. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे, कर नाही त्याला डर कशाला. मी काय चोरी थोडी केली आहे? आमदारांनी माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे सोडून निखीलचा मुद्दा पुढे आणला. माझ्याकडेही तुमच्या कुटुंबियांची माहिती आहे, तुमचे वडील हवालदार होते आणि मी तरुण होतो पण बाकीच्या गोष्टी मी काही बाहेर काढत नाही. तुम्ही बोलले तर मी सुद्धा बाहेर काढणारच. आम्ही चांगले जगत आलो आहोत. माझा नगराध्यक्ष आहे कुठे? हा प्रश्न विचारण्याचा माझा अधिकार आहे? ते मी विचारले.
मला प्रश्न विचारण्याचा अधिकार
एकनाथ खडसे म्हणाले की, मी जबाबदारीचे भान ठेवून बोलतो नगराध्यक्ष कुठे आहेत हे सांगितले त्याला 500 रुपये बक्षीस सुद्धा यावेळी खडसेंनी जाहीर केले. आमदार चंद्रकांत पाटील घरच्या समस्यामुळे उदिग्न अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बोलण्याची गरज नाही.
हे ही वृत्त वाचा
काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झालेत:कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस, राहुल गांधींच्या मोर्चावर एकनाथ शिंदेंची टीका

संविधान हातात घेत ते धोक्यात आहे, असे म्हणत ते कसे नष्ट होईल, हे काम काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. दिल्लीत जी काही राजकीय आंदोलने झाली, ती काही साधी बाब नाही; हे देशासाठी घातक आहे. अनेक परकीय शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झाले आहेत. हा सर्व आंतरराष्ट्रीय कटकारस्थानाचा भाग असल्याची शंका येत असून, देशाला अशांत करण्याचे आणि अराजकता माजवण्याचे कृत्य विरोधी पक्षाकडून सुरू आहे; जे अतिशय दुर्दैवी असून देशासाठी घातक आहे, असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर