Headlines

Amazon Great Indian Festival Pune Leads; Maharashtra Sales Surge



ॲमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२६ ला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दोन दिवसांत Amazon.in वर ४४ कोटींहून अधिक भेटींची नोंद झाली आहे. कंपनीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद असल्याचा दावा ॲमेझॉनने केला आहे. या खरेदी उत्सवा

.

ॲमेझॉन बाजारच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात या मंचावर प्रथमच खरेदी करणाऱ्या ग्राहकांची सर्वाधिक संख्या पुण्यात नोंदवण्यात आली आहे. पुण्यात घरगुती वापराच्या वस्तू, स्वयंपाकघरातील साहित्य, महिलांचे कपडे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांना मागणी वाढली आहे. नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध शहरांमध्येही ऑनलाइन खरेदीचा विस्तार होत आहे. महाराष्ट्रात ॲमेझॉन बाजारवरील नवीन ग्राहकांची संख्या वर्षभरात दीडपट वाढली आहे.

ॲमेझॉन इंडियाच्या ॲमेझॉन बाजारचे उत्पादन प्रमुख अभिमन्यू कोठारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या सुरुवातीच्या काळात ॲमेझॉन बाजारच्या ऑर्डर्समध्ये सामान्य दिवसांच्या तुलनेत अडीचपट वाढ झाली. पाचशे रुपयांपेक्षा कमी किमतीतील तीन कोटींहून अधिक उत्पादनांचा पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. फेरी लाइट्स, साड्या, पारंपरिक पिशव्या, जुत्ती आणि चनिया चोली यांसारख्या सणासुदीच्या वस्तूंनाही मागणी आहे.

राज्यात ॲमेझॉन बाजारवरील विक्रेत्यांची संख्या वर्षभरात दुप्पट, तर उत्पादनांची विविधता दीडपट वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. देशभरातील दोन लाख २० हजारांहून अधिक विक्रेते महाराष्ट्रात आहेत. कंपनीच्या मते, २०२४ मध्ये सुरुवात झालेल्या ॲमेझॉन बाजारच्या मध्यम आणि लहान शहरांतील ग्राहकांमध्ये आठपट वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात या मंचावर विविध उत्पादनांवर सवलती आणि कॅशबॅकची सुविधाही उपलब्ध आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *