![]()
नांदगाव खंडेश्वर येथे इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढला. फॉर्म सहामधील बदल व एसआयआर (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रिया रद्द करण्याची मागणी गुरुवारी तहसील कार्यालयावर केली. काँग्रेस नेते प्रा. विरेंद्र जगताप व भाकप नेते कॉ. तुकाराम भस्मे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. बसस्थानकापासून सुरू झालेल्या आंदोलनात इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलकांनुसार, फॉर्म सहामधील बदलांमुळे मतदार नोंदणी प्रक्रियेवर शंका आली. यामुळे १३ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क गमावला, ज्यात दलित, ओबीसी, मुस्लीम व आदिवासींची संख्या मोठी आहे. निवडणूक आयोग भाजपला मदत करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. लोकशाही धोक्यात येत असल्याने ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होती. मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवले. त्यात निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व मतदारांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याची मागणी केली.
Source link
इंडिया आघाडीचा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा:फॉर्म सहामधील बदलांना विरोध, एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी