![]()
पाचोड परिसरात चोरीच्या घटना वाढल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, बीड रोडवरील जय भवानी हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी हॉटेलमधून देशी दारूचा ३६ हजार रुपयांचा साठा आणि किराणा माल लंपास केला. पाचोड येथील प्रतीक अंबादास नरवडे यांचे बीड रोडवरील राष्ट्रीय महामार्गालगत जय भवानी बिअर बार व हॉटेल आहे. बुधवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून तेथील देशी दारूचा साठा व किराणा साहित्य चोरून नेले. गुरुवारी सकाळी प्रतीक नरवडे हॉटेलमध्ये आले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने पाचोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या घटनेमुळे महामार्गालगतच्या व्यावसायिक आस्थापनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरट्यांनी हॉटेलमध्ये कसा प्रवेश केला आणि कोणते वाहन वापरले, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला चोरटा.
Source link
चोरटे सीसीटीव्हीत कैद:पाचोडच्या जय भवानी हॉटेलमधून 36 हजार रुपयांची दारू पळवली, पाचोड पोलिसांकडून तपासाला वेग