![]()
चांदूर बाजार पोलिसांनी मध्य प्रदेशातील आंतरराज्यीय मोटरसायकल चोर टोळी पकडली. दोन चोरटे अटक झाले असून, ८.५० लाख किमतीच्या ८ मोटारसायकली जप्त केल्या. २२ सप्टेंबर रोजी गजानन वानखडे (रा. शिंगराजगाव अर्डक) यांची २.२० लाख किमतीची रॉयल एनफिल्ड चोरीला गेली. तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार, १८ ऑक्टोबरला गुप्त माहिती मिळाली. चोरीला गेलेली मोटारसायकल आठनेर येथे विक्रीसाठी येणार होती. या माहितीवर पोलिसांनी सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चांदूर बाजार, शिरखेड, सरमसपुरा (अचलपूर) हद्दीतून ८ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. आरोपी संतोष गुलाब उईके (२७, रा. रगडगाव, मध्य प्रदेश) आणि एका अल्पवयीन मुलाला पकडले. पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या नेतृत्वात पथकाने कारवाई केली.
Source link
आंतरराज्यीय मोटरसायकल चोर टोळी चांदूर बाजार पोलिसांच्या ताब्यात:दोन चोरटे अटक,8.50 लाख किमतीच्या 8 मोटारसायकली जप्त