![]()
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबारानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून विरोधकांनी थेट राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत आक्रमक पोस्ट करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दानवेंनी दिली 5 मोठ्या गोळीबारांची यादी अंबादास दानवे यांनी केवळ टायगर श्रॉफ प्रकरणावरच भाष्य केले नाही, तर गेल्या काही महिन्यांत मुंबई आणि आसपासच्या परिसरात घडलेल्या हाय-प्रोफाईल गोळीबाराच्या घटनांची यादीच समोर ठेवली आहे. यामध्ये त्यांनी 5 प्रमुख घटनांचा उल्लेख केला आहे: या घटनांची मालिका मांडत दानवे यांनी राज्यातील गुंडगिरी आणि गँगस्टर्सचे प्रस्थ कसे वाढले आहे, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘गुरूने गँग संपवल्या, शिष्याच्या राज्यात मात्र…’ या पोस्टमधून दानवे यांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर थेट प्रहार केला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना आपले राजकीय गुरू मानतात. मुंडे हे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड आणि गँगवार मोडून काढले होते, या संदर्भाचा आधार घेत दानवे यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे. “ज्या नेत्याने मुंबईतील गँग संपवल्या, त्याच नेत्याचा शिष्य म्हणवून घेणारी व्यक्ती आज राज्याची गृहमंत्री आहे! पण दोघांमधला फरक अगदी स्पष्ट आहे,” असा टोला दानवे यांनी लगावला आहे. राज्यात इतके गंभीर गुन्हे घडत असतानाही कोणीही त्यावर उघडपणे बोलायला तयार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. भाजप कार्यकर्त्यांवर उपहासात्मक टीका दानवे म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले स्पष्ट दिसत असतानाही, “जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे (भाजपचे) कार्यकर्ते मात्र या गृहमंत्र्यांना अजूनही ‘कार्यक्षम’ म्हणतात,” असा उपहासात्मक बाण दानवे यांनी सोडला आहे. एकिकडे देवेंद्र फडणवीस यांनी गँगस्टर्सना शोधून काढण्याचा इशारा दिला असतानाच, दुसरीकडे अंबादास दानवे यांनी ही पोस्ट करत गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. यामुळे आता या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आणखी मोठी जुंपण्याची शक्यता आहे. ——————— हेही वाचा.. टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी 3 संशयित राजस्थानमधून ताब्यात:एक बिहारचा, 2 हरियाणाचे; हल्ल्यात वापरलेली दुचाकीही जप्त; 4 वर्षांत 8 कलाकारांवर हल्ले
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबार प्रकरणी कोटा पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी दोघे हरियाणाचे आणि एक बिहारचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांपैकी दोघांनी गोळीबार केला. मुंबई गुन्हे शाखा राजस्थान आणि गुजरातमध्ये छापे टाकत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबारानंतर आरोपी एस.व्ही. रोडवरून विले पार्ले आणि अंधेरीमार्गे पळून गेले. त्यांनी आपली बाईक अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशनजवळ सोडून बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवेश केला. सविस्तर वाचा
Source link
गुरूने गँग संपवल्या, शिष्याच्या राज्यात मात्र गोळीबार:5 घटनांची यादी शेअर करत अंबादास दानवेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला