![]()
नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज (मंगळवार, २० ऑक्टोबर) सायंकाळी ५.३० वाजता ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेल्या धम्मक्रांतीचा जागर या निमित्ताने होईल. यंदाच्या सोहळ्यात बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाची सद्यस्थिती अनुयायांना सांगितली जाईल. उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड. शैलेश नारनवरे न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देतील. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. फ्रान्स आणि म्यानमारचे भिक्खू प्रमुख अतिथी असतील. दीक्षाभूमीच्या सुशोभीकरणाच्या कामांची माहितीही यावेळी दिली जाईल.
Source link
70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आज:सर्वोच्च न्यायालयातील बुद्धगया प्रकरणाची सद्यस्थिती अनुयायांना सांगणार