![]()
सत्तेचा अमरपट्टा हा जनतेच्या हाती असतो आणि जनता नरेंद्र मोदी आणि भाजपच्या पाठीशी आहे. मविआचे सरकार असताना ते 25 वर्षे जाणार नाही असे छाती ठोकपणे सांगणारे तुम्ही या जनतेने तुम्हाला अडीच वर्षे सुद्धा ठेवले नाही, तुम्ही 25 वर्षांच्या गप्पा करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कायम देश प्रथम म्हणून काम करत असतात, त्यामुळे त्यांना हटवण्याच्या गप्पा राऊतांनी करू नये. स्वत:च्या पक्षाचे काय झाले, उद्धव ठाकरेंची अवस्था झाली ते बघायला हवे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, पूर्णेकर हत्याकांड असो की टायगर श्रॉफ यांच्यावरील गोळीबार प्रकरण असो गृहमंत्र्यांनी तातडीने कारवाई केली आहे. देवेंद्र फडणवीस कुठल्याही गुन्हेगारांना सोडणार नाही. महाराष्ट्र पोलिस अत्यंत चोख पद्धतीने काम करत आहेत. पण मविआच्या काळात अनेक प्रकरणे झाली त्यावेळी राऊत काय करत होते? उद्धव ठाकरे काय करत होते? तुम्ही वाझेंना पाठीशी घातले होते. तुम्ही पोलिसांच्या माध्यमातून माफियागिरी करत होतात असा आरोप नवनाथ बन यांनी मविआवर केला आहे. उबाठाच्या काळात राज्यात गुंडाराज नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 100 कोटी रुपये वसुलीचे कांड तुमच्या काळात झाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या काळात माफिया आणि गुंडाराज होता. आमच्या काळात देवाभाऊ आरोपींना शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करत असतात. राऊतांचा मनसुबा समोर आला नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाची सत्ता स्वत:च्या हाती घेण्याचा मनसुबा राऊत यांचा आहे. त्यांना काँग्रेसमध्ये हा गट विलीन करायचा आहे. त्यासाठी त्यांनी सर्व तयारी सुरू केली आहे. देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित आहे. उबाठा गटाची सूत्र आपल्या हाती घेत काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे राऊतांचे मनसुबे आता उघड झाले आहेत. उबाठाचा दसरा की हसरा मेळावा? नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून काय बदल झाला हे राऊतांनी पाकिस्तानला विचारले पाहिजे. मुंबईमध्ये सारखे स्फोट होत होते ते आता होत नाही, मुंबई सुरक्षित आहे. आता तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत नाही. काश्मीरमध्ये 24 तास तिरंगा फडकतो आहे तिथले चित्र बदलले आहे. तुमच्या काळात घरं लुटली गेली तर देवाभाऊंच्या काळात घरं देण्यात आली आहे. देशाचे शत्रू हे राऊतांसारखे लोकं आहेत ज्यांना देशात अराजकता निर्माण करायची आहे. पण ते स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात. तुमचा निवडणूक आयोगावर विश्चास नाही, तर जनतेचा तुमच्यावर विश्चास नाही. देशात प्रभु श्री रामचंद्राचेच राज्य चालणार आहे. उबाठाचा आज दसरा की हसरा मेळावा आहे हे राऊतांनी सांगावे. हे ही वृत्त वाचा 70,000 शूटर्सच्या दाव्यावर अमित शहा गप्प का, संजय राऊतांचा सवाल:म्हणाले- बॉलिवूड तुमचे प्रचारक म्हणून त्यांना सुरक्षा, अन् सामान्य कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडल्या तरी चालतील?
“शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) आज होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील आणि देशातील जुलमी राजवटीचा ‘रेझिम चेंज’ (सत्तापालट) करण्याचा अंतिम एल्गार आज शिवतीर्थावरून पुकारला जाईल. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत, जनतेच्या रोषापुढे त्यांना पायउतार व्हावेच लागेल. मुंबई आज गुंड आणि भाजपशी संबंधित बिल्डरांच्या दावणीला बांधली गेली आहे. अभिनेत्यांच्या गाड्यांवर गोळ्या चालल्या की सत्ताधारी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतात, मात्र ठाण्यात घरासमोर मारल्या गेलेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला कोणालाही वेळ नाही. हा दुटप्पी कारभार महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे,” असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार, बिश्नोई टोळीचे नेटवर्क, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यातील घडामोडी, कोल्हापुरातील ‘गोकुळ’ दूध संघाचा निकाल आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर रोखठोक भाष्य केले. वाचा सविस्तर
Source link