![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत ही प्रक्रिया पार पडेल. एकूण २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रे तयार केली आहेत. ३५ हजार ८१० मतदार आपला हक्क बजावतील. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेतली जात आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबरला लोकशाही भवनात होईल. निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८१ मतदान केंद्रांवर २४३ अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. ५३ कर्मचारी राखीव ठेवले आहेत. सर्व केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. मतदानाचे वेबकास्टिंग केले जाईल. मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात ध्वनीवर्धक वापरण्यास बंदी आहे. राजकीय पक्षांना बुथ लावता येणार नाहीत. बेकायदेशीर जमाव, प्रचार किंवा मतदारांना प्रभावित करण्यावर कडक प्रतिबंध आहेत.
Source link
विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघासाठी उद्या मतदान:26 उमेदवार मैदानात, 27 ऑक्टोबरला लोकशाही भवनात मतमोजणी