![]()
अमरावती जिल्ह्यातील सर्व चौदा तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दुष्काळाचा सामना करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे. यात १० टक्के पाणी कपात आणि चारा वाहतूक बंदीसारखे उपाय लागू केले आहेत. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत सिंभोरा धरणातील १० टक्के पाणी राखीव ठेवले आहे. रोजच्या वापरातही १० टक्के कपात प्रस्तावित आहे. खरीप पिकांसाठी एक, तर रब्बीसाठी दोन वेळाच पाणी सोडले जाईल. यंदा ५६ टक्केच पाऊस झाल्याने पाण्याची कमतरता जाणवत आहे. सार्वजनिक जलस्रोतांपासून एक किलोमीटर परिसरात नवीन बोअरवेल खोदण्यावर बंदी आहे. जलसंधारण, मनरेगाची कामे आणि प्रत्येक शेतात जलतारा (जलशोष खड्डा) तयार केला जाईल. शेतकऱ्यांसाठी ७३६ कोटींची मदत सरकारकडे मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शहरात बोअरवेलवर सरसकट बंदी नाही, पण सार्वजनिक जलस्रोतांजवळ ती लागू आहे.
Source link
अमरावती जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी कृती कार्यक्रम तयार:पाणी कपात, चारा वाहतूक बंदी; जलतारा आणि मनरेगाची कामे वाढवणार