![]()
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर जुहू येथील फुटबॉल मैदानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा संपूर्ण कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या हल्ल्यामागे साकीनाक्यातील एका हॉटेलमध्ये ५ दिवस राहिलेल्या तीन शूटर्सचा हात असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींच्या पळण्याच्या मार्गाचाही छडा लावला आहे. दरम्यान, संशयितांनी महिन्यांत ४ हॉटेल बदलले. १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान हे संशयित अंधेरी-साकीनाका परिसरातील ‘आर. आर. रेसिडेन्सी’ हॉटेलच्या खोली क्रमांक २०१ मध्ये राहिले होते. अधिकृत ओळखपत्र देऊन त्यांनी ही खोली मिळवली होती. हल्ल्याच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने पिस्तुलांनी भरलेली निळी बॅग घेऊन आरोपी हॉटेलबाहेर पडल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले आहे. यातील एक जण पायी तर अन्य दोघे दुचाकीवरून गेले. सायंकाळी साडेसहा वाजता जुहू येथे गोळीबार केल्यानंतर त्यांनी दुचाकीने अंधेरी गाठली. तेथून लोकलने कांदिवली आणि नंतर थेट खासगी कॅबने सुरतच्या दिशेने पळ काढल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांना चकवण्यासाठी लोकल ते खासगी कॅबचाही केला वापर आरोपींनी जुन्या चुकांमधून धडा घेत पकडले जाऊ नये म्हणून गेल्या महिनाभरात अंधेरी परिसरातील ४ हॉटेल्स बदलली. सेलिब्रिटींच्या हालचालींवर पाळत ठेवणे सोपे जावे, अशा ठिकाणांची निवड त्यांनी केली होती. साकीनाका ते जुहू दुचाकीवर, त्यानंतर अंधेरी ते कांदिवली लोकल आणि पुढे सुरतसाठी खासगी कॅब, असा सार्वजनिक व खासगी वाहतुकीचा वापर करून त्यांनी पोलिसांना गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला. आता सर्व आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाईची तयारी सुरू आहे. खोलीत शस्त्र हाताळताना अचानक ‘मिसफायर’ होऊन गोळी गादीस लागली खोलीत शस्त्र हाताळताना अचानक ‘मिसफायर’ होऊन एक गोळी थेट गादीवर लागली होती, अशी धक्कादायक माहिती हॉटेल व्यवस्थापकाने दिली. पोलिसांनी गादीवरील गोळीचे निशाण आणि पुरावे जप्त केले आहेत. या कटासाठी मुंबईत शस्त्रे पोहोचवण्याचे काम कुणाल नावाच्या व्यक्तीने पैसे देऊन राधा आणि बबिता या दोन महिलांमार्फत केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मोबाइल फेकून दिल्याची शक्यता असून, पोलिस त्यांचा डेटा तपासत आहेत.
Source link
खोलीत शस्त्रांची चाचणी:टायगरवरील हल्ल्यापूर्वी 3 शूटर्सनी एका महिन्यात 4 हॉटेल्स बदलली, साकीनाक्याच्या हॉटेलात 5 दिवस थांबले