Headlines

नाशिक, बारामतीत बेकायदा स्त्रीबीज रॅकेटवर ‘ईडी’ची धाड:29 लाखांची रोकड जप्त, बँक लॉकर्स गोठवले




ठाणे, नाशिक आणि बारामतीत बेकायदेशीर स्त्रीबीज (विक्री आणि काढण्याच्या रॅकेटविरोधात ईडीने कारवाई केली आहे. या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने २९ लाख रुपयांची रोकड जप्त केली असून अनेक बँक लॉकर्स आणि म्युच्युअल फंडांमधील कोट्यवधींची गुंतवणूक गोठवली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या जिवाशी खेळून आयव्हीएफ केंद्रांच्या संगनमताने चालणाऱ्या या काळ्या धंद्यावर केंद्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी हा कारवाईचा बडगा उगारला. बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच महिलेचे वारंवार शोषण तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक संकटात असलेल्या महिलांना पैशांचे आमिष दाखवून एजंट्स जाळ्यात ओढत असत. नियमानुसार एका महिलेकडून ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त वेळा स्त्रीबीज काढता येत नाही. मात्र, या नियमाला बगल देण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, शपथपत्रे, रक्त तपासणी अहवाल आणि विम्याची कागदपत्रे अक्षरशः बनावट तयार केली गेली. खरी ओळख लपवून या महिलांना महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतील विविध आयव्हीएफ केंद्रांमध्ये पाठवून त्यांच्या शरीरातून वारंवार स्त्रीबीज काढण्यात आले. ठाणे, बारामती, नाशिकच्या रुग्णालयांवर ईडीचे छापे ईडीने १६ ऑक्टोबर रोजी ठाणे, बारामती आणि नाशिकमधील अनेक रुग्णालये व असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी बँकांवर एकाच वेळी छापे टाकले होते. ठाणे पोलिसांनी यापूर्वी मुख्य संशयित मंजूषा वानखेडे यांच्यासह १७ जणांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे आणि एआरटी कायद्याच्या उल्लंघनाखाली एफआयआर व आरोपपत्र दाखल केले होते. त्याच एफआयआरच्या आधारे ईडीने ‘पीएमएलए’ अंतर्गत मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला आहे. या कारवाईत आणखी काही नवीन एजंट्सची नावे निष्पन्न झाली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *