Headlines

प्रोटेक्शन मनीसाठी शहरात गँगवॉर:रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारला प्रोटेक्शन मनीतून उदयास येताहेत भाई-दादा; पोलिसांचे मात्र दुर्लक्ष



सिडको परिसरात भरदिवसा झालेल्या बंटी दीक्षितच्या हत्येने शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ही हत्या केवळ वैयक्तिक वादातून नव्हे, तर बिअर बारच्या प्रोटेक्शन मनीवरून उफाळलेल्या गँगवॉरचा परिणाम आहे. तेव्हा शहरात प्रोटेक्शन मनी

.

एका बारकडून महिन्याला ३० ते ४० हजार रुपये : शहरातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बिअर बार आणि हॉटेल्सना सुरक्षा देण्याच्या नावाखाली एका बारकडून महिन्याकाठी ३० ते ४० हजार रुपये आकारले जातात. मुंबई-पुण्याच्या धर्तीवर आता छत्रपती संभाजीनगरातही हॉटेल व्यावसायिक सुरक्षेसाठी पोलिसांऐवजी या खासगी व्यक्तींना पैसे देणे पसंत करत आहेत. शहरातील अनेक बारवरून लाखो रुपयांची प्रोटेक्शनसाठी उलाढाल चालत असल्याची माहिती आहे.

आठवड्यात लक्ष वेधणाऱ्या घटना

जवाहरनगर : १५ ऑक्टोबर: तरुणीशी का बोलतो म्हणत एकाने तौसिफ शेख या तरुणाची हत्या केली. एमआयडीसी वाळूज : २० ऑक्टोबर: जुन्या वादातून रांजणगाव शेणपुंजी येथे पिता-पुत्राची हत्या. मुकुंदवाडी: २० ऑक्टोबर: आईवरून शिवी दिल्याच्या कारणावरून तरुणाची लोखंडी गजाने हत्या. सिडको: २२ ऑक्टोबर : बार प्रोटेक्शनच्या वादातून तरुणाची हत्या.

सोशल मीडिया भाईगिरीचा अड्डा

शहरातील हे वर्चस्व केवळ प्रोटेक्शन मनीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्याचे प्रदर्शन सोशल मीडियावर उघडपणे केले जाते. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲप स्टेटसला हातात शस्त्रे घेतलेले रील्स, विरोधी गटाला धमक्या देणारे व्हिडिओ आणि राजकीय नेत्यांसोबतचे फोटो टाकून तरुणांमध्ये दहशत निर्माण केली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गँगवॉर अधिक भडकत आहे.

‘गँग मला सोडणार नाही, पोलिस ठाण्यात आलो’

आरोपी पवन पराशरने बंटीची भररस्त्यात हत्या केली. त्यानंतर आपल्याला प्रोटेक्शन मनीच्या गँग्ज सोडणार नाही, याची माहिती असल्याने मी थेट पोलिस ठाण्यात आल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पैशांचा वाद आणि दोन दिवसांपूर्वीची शिवीगाळ यामुळे त्याच्या डोक्यात प्रचंड राग गेला होता. त्यामुळे त्याने हत्येचा निर्धार केला. मात्र बाहेर राहिलो तर जिवाला धोका असल्याचे त्याला माहीत होते. भररस्त्यात त्याला संपवायचे आणि आपली भाईगिरी सिद्ध करायची असेदेखील ठरले होते. त्यामुळे त्याने बंटीचा अर्धा ते एक किमी पाठलाग केला. एसबीआयसमोर नेहमी नागरिकांची गर्दी असते, तसेच तेथे यू-टर्नची जागादेखील असल्याने तेथेच त्याला उडवले. त्यानंतर काहीच अंतरावर पोलिस स्टेशन असल्याने पवन तातडीने तेथे गेला. पोलिस ठाण्यात गेल्यावर सुरुवातीचा तासभर पवन पोलिसांशी बोलला नाही. तो होकार दर्शवायचा. घटनेनंतर तासाभराने उपायुक्त नवले, एसीपी मनीष कल्याणकर, निरीक्षक गजानन कल्याणकर, अतुल येरमे यांनी त्याची चौकशी केली.

असे चालते नेटवर्क

शहरातील अनेक बारवर हे प्रोटेक्शन देणारे तरुण सायं.६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ठाण मांडून असतात. मद्यपींनी गोंधळ घातल्यास किंवा बिलावरून ग्राहकांसोबत वाद झाल्यास हे तरुण बाउन्सरसारखे काम करत ग्राहकांना मारहाण करतात. या तरुणांना शहरातील राजकीय नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा थेट आश्रय आहे. त्यामुळे किरकोळ हाणामारी झाली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही.

आयुष्यातील नैराश्यातून राग होतो अनावर

सोशल मीडिया, मोबाइल गेमिंग, करिअरचा ताण आणि कुटुंबातील संवादाअभावी तरुणांची सहनशीलता संपत चालली आहे. याच नैराश्यातून राग अनावर होतो. राग आल्यास तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी दीर्घ श्वास घ्यावा. एका क्षणाचा राग संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आभासी जगापेक्षा प्रत्यक्ष नात्यांना वेळ द्या. मानसिक अस्वस्थता वाटल्यास समुपदेशकाची मदत घेणे हा दुबळेपणा नसून शहाणपणा आहे. – डॉ. संदीप सिसोदे, मानसोपचार तज्ज्ञ.

दीड वर्षापूर्वी गँगवॉरमध्ये बंटीचा जीव वाचला

दोन वर्षांपूर्वी बंटीवर धम्मा नावाच्या गुन्हेगाराने हल्ला केला होता. यात बंटी जखमी झाला होता. त्या वेळी तो १५ ते २० दिवस रुग्णालयात ॲडमिट होता. या प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात बंटीची गुरुवारीच कोर्टात साक्ष होती. प्रकरणातील आरोपी वेगळे असले तरी त्याचा याच्याशी काही संबंध होता का, याचा तपास सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *