Headlines

नौदलाचे 'अग्निवीर' महाराष्ट्राच्या कोस्टल पोलिस दलात:कठोर प्रशिक्षण घेतलेल्या जवानांमुळे सागरी सुरक्षा भक्कम होणार- CM देवेंद्र फडणवीस




नौदलातील आपला कार्यकाळ पूर्ण करून परतलेल्या 250 हून अधिक ‘अग्निवीरां’ना महाराष्ट्र पोलिसांच्या सागरी सुरक्षा दलात (कोस्टल पोलिस) सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जवानांच्या कठोर प्रशिक्षण आणि अनुभवामुळे राज्याची सागरी सीमा अधिक सुरक्षित होण्यास मोठी मदत मिळणार असून, त्यांना पोलिस दलात सामावून घेण्यासाठी नियमांत आवश्यक बदल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता की महाराष्ट्रातले जेवढे अग्निवीर हे आपला कार्यकाल संपवून परत येतील, त्यातील ज्या अग्निवीरांना महाराष्ट्र पोलिसमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना आम्ही सामावून घेऊ. याचे कारण अतिशय कठोर अशी ट्रेनिंग घेतलेले हे जवान आहेत. यांनी सीमेवर देखील काम केले आहे. प्रचंड अशा प्रकारची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळे इतके ट्रेन्ड लोकं पोलिसांच्या अतिशय कामाचे राहतील. आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. अडीचशे अग्निवीर महाराष्ट्र कोस्टल पोलिस दलात पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यामुळे पहिल्यांदा आमच्याकडे नौदलाची बॅच आलेली आहे. या नौदलाच्या बॅचमधले सगळे अग्निवीर हे आम्ही सामावून घेतले आहेत. या सगळ्यांना आपल्या कोस्टल पोलिसमध्ये घेतले आहे. उलट याचा आपल्याला असा फायदा झाला आहे की कोस्टल पोलिसमध्ये आपल्याला सातत्याने बिल्डिंग करणे गरजेचे होते, कारण त्या प्रकारचे ट्रेनिंग आपल्याकडे उपलब्ध नव्हते. कारण त्याची सुरुवात आता आपण केली होती. पण आता हे अडीचशे पेक्षा जास्त आमचे अग्निवीर हे कोस्टल पोलिसमध्ये आल्यामुळे आपली सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी एक अत्यंत ट्रेन्ड मॅनपॉवर आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे नियमांमध्ये काही बदल करून आम्ही सगळ्यांना यात सामावून घेतला आहे. या भरतीसंदर्भात सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही सरळ भरती प्रक्रिया होती. यासाठी चाचणीमधून सूट दिलेली आहे. कारण अतिशय कठीण अशी चाचणी करून ते सेनेत गेले आहेत. त्यामुळे आता त्यांना चाचणीची आवश्यकता नाही. त्यामुळे थेट त्यांना ऑर्डर देण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *