Headlines

तरुणांचे ब्रेनवॉश, जैशच्या हस्तकाला मुंबईत अटक:एटीएसच्या सायबर सेलने पाळत ठेवून कारवाई




मुंबईतील माहिमच्या गजबजलेल्या भागात अत्तर विकणारा आणि बाइक रायडर म्हणून फिरणारा तरुण प्रत्यक्षात पाकिस्तानस्थित ‘जैश-ए-मोहंमद’ या दहशतवादी संघटनेसाठी स्लीपर सेलप्रमाणे काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) काळाचौकी युनिटने शुक्रवारी मध्यरात्री छापा टाकून मोहंमद हसन अबू सरमद अख्तर (वय ३३) याला माहिम मेट्रो स्थानकाजवळील लक्ष्मी बिल्डिंगमधून अटक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातील कथित सुरक्षा त्रुटींच्या बातमीवर आरोपीने ‘एक्स’वर अत्यंत विखारी टिप्पणी केली होती. त्या माहितीनंतर एटीएसच्या सायबर सेलने त्याच्यावर तांत्रिक पाळत ठेवली. चौकशीत आरोपीने पोस्टमध्ये विशिष्ट समुदायाला शस्त्र उचलण्याची तसेच जिहाद करण्याची चिथावणी दिल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या मोबाईलमध्ये जैशचा म्होरक्या मसूद अजहर याच्या भाषणांच्या ऑडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. एटीएसने त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १९६(१) अंतर्गत गुन्हा नोंदवून न्यायालयातून कोठडी मिळवली आहे. या कारवाईमुळे शहरातील संभाव्य घातपाताचा कट उधळल्याचे मानले जात आहे. दहशतवादी मसूदच्या क्लिप मोबाइलमध्ये आरोपीच्या मोबाइलमध्ये जैशचा म्होरक्या मसूद अजहर याच्या भाषणांच्या क्लिप्स सापडल्या आहेत. एटीएसने त्याच्याविरोधात बीएनएस कलम १९६(१) अंतर्गत गुन्हा नोंदवून न्यायालयातून कोठडी मिळवली आहे. या कारवाईमुळे शहरातील संभाव्य घातपाताचा कट उधळल्याचे मानले जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *