Headlines

मराठवाड्यात 9 महिन्यांत तब्बल 760 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:पावसाने पाठ फिरवल्यानंतर सप्टेंबर महिन्यातच 108 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले


मराठवाड्यात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा गर्तेत शेतकरी सापडला आहे. यंदा विभागात पावसात ३८ टक्के तुटीमुळे खरिपाचे पीक हातून गेले असून रब्बीचीही आशा मावळली आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी मालाला भाव नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, या दुष्टचक्रात

.

मराठवाड्यातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. गेल्या ५-६ वर्षांत अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यंदा मात्र पावसाने मोठी दडी मारल्याने पाणीटंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. आजघडीला विभागातील २७६ गावे आणि ९१२ वाड्यांना ४७३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्यासाठीच पाणी नाही, तेथे रब्बीचा पेरा कसा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

आत्महत्यांची ४०३ प्रकरणे मदतीसाठी ठरली पात्र

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रशासकीय आकडेवारीनुसार, या ७६० पैकी ४०३ प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली आहेत. मात्र, २८२ प्रकरणे अद्यापही चौकशी किंवा निर्णयासाठी प्रलंबित असून, प्रशासनाने ७५ प्रकरणे अपात्र ठरवली आहेत.

गेल्या वर्षी १,१३१ आत्महत्या

जानेवारी ते डिसेंबर २०२५ या संपूर्ण वर्षभरात मराठवाड्यात तब्बल १,१३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदाच्या नऊ महिन्यांत (जानेवारी ते सप्टेंबर २०२६) हा आकडा ७६० वर पोहोचला आहे. यात सर्वाधिक १७० आत्महत्येच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात घडल्या आहेत. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५४ दुर्दैवी घटनांची नोंद झाली आहे. नुसत्या सप्टेंबर महिन्याचा विचार केल्यास बीडमध्ये २१, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६, तर नांदेडमध्ये १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *