![]()
दिवाळीच्या सणासुदीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील माळीवाडा भागातील पंचपीर चावडी येथील एका दुकानावर छापा टाकून ४४३ किलो संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यात मिरची पावडर, हळद पावडर, गोडीशेव आणि हिरव्या वाटाण्याचा समावेश असून, जप्त मुद्देमालाची किंमत १ लाख ८१ हजार ६०० रुपये आहे. पदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर, निकृष्ट दर्जा आणि चुकीच्या लेबलिंगचा संशय असून, नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विशेष मोहिमेअंतर्गत सहआयुक्त माने यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. झोन-१ चे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेल्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्यात ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त (१०० पीपीएमपेक्षा अधिक) घातक कृत्रिम रंग आढळल्यास संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार थेट न्यायालयात खटला अथवा एफआयआर दाखल केला जाईल. अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित किंवा कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस केली जाईल. गौरव जगताप यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी साजिदामुल्ला आणि पी. पी. पवार यांच्या पथकाने माळीवाड्यातील पंचपीर चावडी येथील प्रसिद्ध फरसाण दुकानावर छापा टाकला. कारवाईत ९० हजार रुपये किमतीची १८० किलो ‘रेड रॉकेट’ मिरची पावडर, ६५ हजार रुपये किमतीची १३० किलो ‘वेद मसाले’ हळद पावडर, १५ हजार रुपये किमतीची ७५ किलो सुटी गोडीशेव आणि ११ हजार ६०० रुपये किमतीचा ५८ किलो हिरवा वाटाणा जप्त करण्यात आला. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. भडक रंगाच्या पदार्थांपासून सावध राहा ^भडक रंग आणि स्वस्त दरांच्या आमिषाला बळी पडू नका. कृत्रिम रंगांचा अनधिकृत वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. ग्राहकांनी परवाना क्रमांक व उत्पादनाची तारीख असलेले पॅकबंद पदार्थ खरेदी करावेत. संशयास्पद अन्नपदार्थ आढळल्यास एफडीएकडे तक्रार करावी.” — गौरव जगताप, सहाय्यक आयुक्त, एफडीए, अहिल्यानगर
Source link
माळीवाड्यात एफडीएचा छापा:दिवाळीच्या फराळात भेसळीचा संशय; 443 किलो साठा जप्त, गोडीशेव, वाटाण्याचा 1.81 लाखांचा मुद्देमाल जप्त