![]()
राज्यभरातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी आज मतमोजणी होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. मात्र, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर आज सकाळी मोठा गोंधळ उडाला. मतमोजणी केंद्रात आलेल्या ८ मतपेट्यांना सील नसल्याचा गंभीर आक्षेप महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव यांनी घेतला. या आक्षेपामुळे आणि निर्माण झालेल्या गोंधळामुळे मतमोजणीची प्रक्रिया काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. पुण्यातील गोंधळाचे कारण काय? विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी सुरू असताना, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या केंद्रावर मविआच्या उमेदवार हर्षदा जाधव यांनी मतपेट्यांच्या सीलबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, केंद्रावर आणलेल्या ८ मतपेट्यांना योग्यरीत्या सील लावण्यात आलेले नव्हते. या मुद्द्यावरून तिथे उपस्थित मविआचे कार्यकर्ते आणि उमेदवारांनी जोरदार आक्षेप नोंदवला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळामुळे मतमोजणीची प्रक्रिया तात्पुरती थांबवावी लागली. महायुती विरुद्ध मविआ: कुणाचा खेळ कोण बिघडवणार? आज ५ जागांसाठी (३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ) निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आणि मोठ्या प्रमाणावर झालेली बंडखोरी यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या बंडखोरीचा फटका कुणाला बसणार आणि कोणाचा खेळ बिघडणार, हे आज स्पष्ट होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे लक्ष पुणे शिक्षक मतदारसंघातही मोठी चुरस आहे. येथे भाजपकडून कौस्तुभ गावडे, काँग्रेसकडून (मविआ) जयंत आसगावकर, तर शिंदे गटाने पाठिंबा दिलेले अपक्ष सचिन सानप आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्यात काट्याची लढत आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाने सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांना माघार घेण्यास सांगून सानप यांना पाठिंबा देण्यात आला. ————————- हेही वाचा.. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात: महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी? पहिला कल कोणाच्या बाजूने?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली असून, कुणाला धक्का बसणार आणि कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा
Source link
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत मोठा गोंधळ:8 मतपेट्यांना सील नसल्याचा मविआचा आक्षेप; मतमोजणी काही काळ थांबवली