Headlines

ट्रेलरमध्ये उसाच्या मोळ्या व्यवस्थित न बांधल्याने राष्ट्रीय महामार्गावर सडा:शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, रस्त्यात पडलेल्या उसामुळे घडतात अपघात




सध्या २०२६-२७ च्या ऊस गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहे. बोअर, विहिरींच्या पाण्याचे स्रोत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. बहुतांश शेतकऱ्यांचा ऊस हा अखेरची घटका मोजत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. अशा स्थितीत लवकरात लवकर कारखाना ऊस गळीतास घेऊन जाईल, त्यांना सध्या ऊस तोडणी देण्यास शेतकऱ्याने सुरुवात केली आहे. मात्र ऊस तोडणी कामगारांनी ऊस वाहतूक वाहनांत ऊस मोळी व्यवस्थित न भरल्याने महामार्गावर अक्षरश: उसाचा सडा पडलेला दिसून येत आहे. अहोरात्र जीवाचे रान करून सांभाळलेल्या उसाचे असे वाटोळे होत असल्याने शेतकऱ्याला फटका बसत आहे. एक तर ऊस दर जाहीर नाही. त्यात ऊस तोडणी कामगारांबरोबरच वाहतूकदारही शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. शेतकऱ्यांच्या ऊस नुकसानीसह ऊस तोडणींदरम्यान शेतकऱ्यांना धारेवर धरून तोडणीसाठी पैसे मागणाऱ्या कामगारांबरोबरच वाहतूकदारावर संबंधित विभागाने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ऊस नुकसानीकडे गांभीर्याने लक्ष घ्यावे ^यंदा नैसर्गिक संकटांमुळे उसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत वाहतूकदारांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गावर ऊस पडून शेतकऱ्यांच्या घामाचे नुकसान होत आहे. मात्र आमच्या नुकसानीकडे कोणाचेही लक्ष नाही. संबंधित विभागाने या प्रकारांची गांभीर्याने दखल घ्यावी. – बंडू डोके, ऊस उत्पादक, शेतकरी टोळ्यांवर कारवाई करण्यात येईल ^ऊस मजुरांनी ऊस भरताना व्यवस्थित भरून द्यावा. ऊस व्यवस्थित न भरल्याने राष्ट्रीय महामार्गासह इतर रस्त्यांवर ऊस मोळ्या पडल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची देखील नुकसान होत आहे. अशा ऊस मजूर टोळ्यांवर कारवाई करण्यात येईल. टेप गाणी लावून जाऊ नये अन्यथा गुन्हे दाखल करणार. -दीपक बर्डे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रेलरमध्ये अशा प्रकारे ऊस सुटत जातो. रस्त्यावर असा सडा पडलेला असतो. टॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात सुरू असतो टेप रेकॉर्डर : मोठ्या आवाजात टेप लावणे, ट्रॅक्टरला मागे रेडियम, मागून हॉर्न मारले तरी त्यांना कळत नाही. अपघाताचे मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे असे कोणी करू नये, स्वतःच्या जीवासोबत दुसऱ्यांच्या जीवाशी खेळू नये. अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कमी करण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या वाहनधारकासह वाहनांवर कारवाई करावी .



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *