Headlines

Pune Teachers Constituency Election Controversy; Dattatray Sawant Allegations


पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत स्पष्ट झालेल्या निकालांनंतर पराभव स्वीकारताना राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अधिकृत उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर अत्यंत गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत. “राज्यातील बुद्धिवादी

.

मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये महायुतीचे कौस्तुभ गावडे पहिल्या क्रमांकावर, सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर आणि दत्तात्रय सावंत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेल्यानंतर त्यांनी ही रोखठोक प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत निकाल मान्य असला तरी ही निवडणूक पैशाच्या बळावर आणि वाममार्गाने जिंकली गेल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

62,000 मतदारांपैकी 52,000 शिक्षकांच्या घरापर्यंत पाकिटे पोहोचवली गेली

निवडणुकीतील गैरप्रकारांचा पाढा वाचताना दत्तात्रय सावंत म्हणाले, “पुणे शिक्षक मतदारसंघांमध्ये एकूण 62,000 शिक्षक मतदार होते. समोर आलेली माहिती धक्कादायक आहे; एका पक्षाने तब्बल 52,000 शिक्षकांना तर दुसऱ्या उमेदवाराने 42,000 शिक्षकांना पैसे वाटप केले. शिक्षकांनी स्वतःहून लाच मागितली नाही, परंतु राजकीय पक्षांचे कार्यकर्ते थेट शिक्षकांच्या उंबरठ्यापर्यंत गेले आणि दारात बळजबरीने पैसे टाकून आले. दुसरा व तिसरा उमेदवार 5,000, 7,000 ते थेट 11,000 रुपयांपर्यंत वाटप करत होता.”

बुद्धिवादी शिक्षकांची निवडणूक कलंकित

“महाराष्ट्रातला शिक्षक हा सुशिक्षित आणि स्वाभिमानी आहे. आजवर या मतदारसंघात राजकीय पक्ष असा नंगानाच करत नव्हते. मात्र, यंदा ही निवडणूक हायजॅक करण्यासाठी राजकीय पक्षांनी पैशांचा पाऊस पाडून सर्व मर्यादा ओलांडल्या.”

58 तालुक्यांत परराज्यातील आमदार-खासदार तळ ठोकून

निवडणूक प्रचारातील राजकीय हस्तक्षेपावर बोट ठेवताना त्यांनी यंत्रणेवर तोफ डागली. “माझ्यावर शिक्षकी संस्कार असल्याने मी वैयक्तिक कोणाची नावे घेणार नाही. मात्र, ज्या राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली, त्यांनी थेट इतर राज्यांतून आणि जिल्ह्यांतून आपले आमदार, खासदार आणून मतदारसंघातील 58 तालुक्यांमध्ये 15 दिवस बसवून ठेवले होते. हे नेते शिक्षकांच्या घरावर आणि शाळांवर जाऊन प्रचंड दबाव टाकत होते.”

शिक्षणसंस्थांना धमकावून लाटले मतदान

“शिक्षक हे थेट सरकारी कर्मचारी नसून खासगी संस्थांमार्फत संचलित शाळांचे सेवक आहेत. शाळांच्या मान्यतेवर, अनुदानावर गदा आणण्याची भीती दाखवून थेट संस्थाचालकांवरच राज्यकर्त्यांचा प्रचंड दबाव आणला गेला. त्यामुळे संस्थाचालक हतबल झाले आणि पर्यायाने संस्थाचालकांच्या दबावापोटी शिक्षकांना या वाममार्गाला बळी पडावे लागले.”

कोणत्याही 10 शिक्षकांना विचारा, सत्य समोर येईल

आरोपांच्या पुराव्याबाबत विचारले असता सावंत यांनी आव्हान दिले. “माझ्याकडे पैशांच्या वाटपाचे सीसीटीव्ही फुटेज नाहीत, पण तुम्ही रस्त्यावरील किंवा शाळेतील कोणत्याही 10 शिक्षकांशी मनमोकळेपणाने बोला; त्यातले अनेक शिक्षक तुम्हाला त्यांच्या दारात पैसे कसे आणून टाकले आणि कसा दबाव टाकला गेला, हे सत्य सांगतील. या मतदारसंघात पूर्वी कधीही असा विकृत प्रकार घडला नव्हता.”

निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार

“या संपूर्ण प्रकाराची मी 100% निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार नोंदवणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने मी लोकशाही मार्गाने झालेला माझा पराभव मान्य करतो. मात्र, पराभवानंतरही शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी एक संघटना म्हणून आमचा लढा असाच सुरू राहील.”

——————————————————————————-

हेही वाचा…

मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर:पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.