Headlines

Pune Teachers Constituency Election: Kaustubh Gavade Wins


पुणे शिक्षक मतदारसंघाच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी मोठा विजय मिळवला आहे. गावडे यांच्या विजयामुळे महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना मोठा आणि धक्कादाय

.

पराभवानंतर सचिन सानप यांची पहिली प्रतिक्रिया

या निवडणुकीत कौस्तुभ गावडे यांच्याशी थेट लढत देणाऱ्या सचिन सानप यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. गावडे म्हणाले, शिक्षकांनी जो कौल दिला आहे, तो मी स्वीकारतो. मला ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षाने पाठिंबा दिला, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. काही कमी पडलो असेन, तर तो मीच पडलो, असे मी मानतो. एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. आम्ही शिक्षकांचा आमदार शिक्षक असावा यासाठी लढा उभारला होता, तो यापुढेही सुरू राहील. येणाऱ्या काळात शिक्षकांना नक्कीच जाग येईल.” यावेळी त्यांनी विजयी उमेदवार कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदनही केले.

काँग्रेसला मोठा धक्का

या निवडणुकीतील सर्वात मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. तसेच यापूर्वी आमदार राहिलेल्या दत्ता सावंत यांनाही फटका बसला आहे.

‘शिक्षकांच्या दारात पैशांची पाकिटे फेकली’; दत्तात्रय सावंतांचे गंभीर आरोप

एकीकडे विजयाचा जल्लोष सुरू असताना, दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी निवडणूक प्रक्रियेवरच अत्यंत गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. सावंत म्हणाले, “राज्यातील बुद्धिवादी शिक्षकांची ही निवडणूक राजकीय पक्षांनी पूर्णपणे हायजॅक केली आहे. एका उमेदवाराच्या पक्षाने ५२ हजार शिक्षकांना, तर दुसऱ्या उमेदवाराने ४२ हजार शिक्षकांना थेट घरापर्यंत जाऊन पैसे वाटले आहेत. या निवडणुकीत ८ ते ११ हजार रुपयांपर्यंत रकमेची उधळपट्टी झाली. तसेच, शिक्षणसंस्थांवर राजकीय दबाव आणून शिक्षकांचे मतदान लाटण्यात आले आहे. अशा प्रकारे लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे,” असा संताप सावंत यांनी व्यक्त केला.

कोणत्याही 10 शिक्षकांना विचारा, सत्य समोर येईल

आरोपांच्या पुराव्याबाबत विचारले असता सावंत यांनी आव्हान दिले. “माझ्याकडे पैशांच्या वाटपाचे सीसीटीव्ही फुटेज नाहीत, पण तुम्ही रस्त्यावरील किंवा शाळेतील कोणत्याही 10 शिक्षकांशी मनमोकळेपणाने बोला; त्यातले अनेक शिक्षक तुम्हाला त्यांच्या दारात पैसे कसे आणून टाकले आणि कसा दबाव टाकला गेला, हे सत्य सांगतील. या मतदारसंघात पूर्वी कधीही असा विकृत प्रकार घडला नव्हता.”

—————————————–

हेही वाचा…

मराठवाडा पदवीधरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील 13 हजार मतांनी आघाडीवर: पुणे शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीतून काँग्रेसचे जयंत आसंगावकर बाद

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांच्या मतमोजणीचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आले नसले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.