Headlines

पोस्ट टाकण्याचे 500 मिळतात, पण डिलीट करायलाही पैसे मिळतात:एका फोनवर राज ठाकरेंनी पोस्ट डिलीट केली, सुजात आंबेडकरांचा आरोप




भाजप आणि काँग्रेसचे लोक 500 रुपये घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करतात, कमेंट करतात आणि इतरांना ट्रोल करतात. पण आता एक नवीन पॅटर्न समोर आला आहे. मुंबईतील एक मोठे नेते राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या किंवा गौतम अदानी यांच्या कार्यालयातून फोन आल्यानंतर राज ठाकरेंना ती पोस्ट डिलीट करावी लागली. सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी 500 रुपये मिळतात हे मला माहीत होते, पण पोस्ट डिलीट करण्यासाठी सुद्धा वेगळे पैसे मिळतात, हे त्यांच्यामार्फत समजले, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. सुजात आंबेडकर म्हणाले की, राज ठाकरे यांनी मनपा निवडणुकीच्या वेळी एक आघाडी तयार केली होती. त्या आघाडीपासून आपण सावध राहिले पाहिजे. या आघाडीमध्ये उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट सहभागी होते. या आघाडीच्या लोकांनी गुजराती उद्योजकांच्या विरोधात काम केले, मात्र याच राज ठाकरेंचे गौतम अदानी यांच्या घरी जाणे-येणे असते. धारावीचा प्रकल्प अदानींना कसा देता येईल, यासाठी ठाकरे परिवार काम करतो. हीच लोकं गणपतीच्या काळात एकमेकांच्या घरी जातात. अदानी आणि अंबानी यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार हे नेहमी पुढे असतात, अशी टीकाही त्यांनी केली. ..तर तीव्र आंदोलन करू प्रकाश आंबेडकर म्हणाले की, राज्यात सध्या गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, दिवाळीनंतर ही परिस्थिती आणखी खराब होणार आहे. हे आरएसएसचे लोक सत्तेत बसले आहेत, त्यांनी देवाच्या आणि हिंदूंच्या नावावर मते मागून सत्ता मिळवली आहे. सरकारने पिण्याच्या पाण्याची आणि अन्नधान्याची योग्य व्यवस्था केली नाही, तर आरएसएसचे जिल्हाप्रमुख आणि भाजपच्या जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर आम्ही रांगेत उभे राहून जेवण आणि पाण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला. तोपर्यंत तुम्हाला कोणीही गुलाम करू शकत नाही प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मतदान हे व्यक्ती स्वातंत्र्याचे एक प्रभावी अस्त्र आहे. हे अस्त्र जोपर्यंत तुमच्या हातात आहे, तोपर्यंत तुम्हाला कोणीही गुलाम करू शकत नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, अशी आठवण प्रकाश आंबेडकरांनी करून दिली. धर्माच्या आणि देवाच्या नावावर ओबीसींचे मते घेण्यात आली आणि त्यानंतर ओबीसींच्या उरावर मनोज जरांगे पाटील यांना बसवण्यात आले. हे कोणी बसवले? तर या सरकारनेच त्यांना बसवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पूर्वी ओबीसी उमेदवार सहज निवडून येत होते, पण यावेळी त्या प्रक्रियेत मोठा बदल घडवून आणण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *