Headlines

Maharashtra Karjat Torrent Power Project; Ujjwal Nikam Clarifies Facts


रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण (पंप स्टोअरेज) प्रकल्पावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली असतानाच, ज्येष्ठ विधिज्ञ, विशेष सरकारी वकील तथा भाजपचे खासदार ॲड.

.

कर्जत परिसरातील सायडोंगर व पाली खलाटी भागातील कथित वृक्षतोडीवरून विरोधक आणि पर्यावरणप्रेमींकडून आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर उज्ज्वल निकम यांनी पर्यावरणीय अभ्यास, कायदेशीर परवानग्या आणि प्रकल्पाच्या फायद्यांचे तपशीलवार विश्लेषण केले आहे.

30,000 कोटींची महाकाय गुंतवणूक अन् 12,000 मेगावॉट स्वच्छ वीज!

प्रकल्पाच्या आर्थिक व तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकताना ॲड. निकम यांनी नमूद केले. हा प्रकल्प इतर कोणत्याही राज्याचा नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे. यातून राज्याला तब्बल ३०,००० कोटी रुपयांची थेट औद्योगिक गुंतवणूक मिळणार आहे. या महाकाय प्रकल्पातून महाराष्ट्राला तब्बल 12,000 मेगावॉट विजेची उपलब्धता होणार आहे. हा प्रकल्प कोळशावर चालणारा नसून पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित व पर्यावरणपूरक जलविद्युत साठवण प्रकल्प आहे. पंप स्टोअरेज जलविद्युत प्रकल्प भौगोलिक रचनेवर अवलंबून असल्याने त्याचे स्थान तांत्रिकदृष्ट्या निश्चित असते; तो अन्यत्र कुठेही हलवता येत नाही.

233 हेक्टरसाठी 253 हेक्टर पर्यायी जमीन आधीच सुपूर्द

वृक्षतोड आणि वनजमिनीच्या कायदेशीर मंजुरीबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. या प्रकल्पासाठी 233 हेक्टर जागा लागणार असल्याने, पर्यायी वनीकरणासाठी संबंधित कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. ही कायदेशीर पूर्तता झाल्यानंतरच वन विभागाने कामाला मंजुरी दिली. प्रकल्पाच्या परवानगीसाठी सलग 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पार पाडली गेली आहे. विविध केंद्रीय व राज्य प्राधिकरणांकडून सखोल पर्यावरणीय अभ्यासानंतरच सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. याच प्रकल्प क्षेत्रात टोरेंट कंपनीतर्फे 60,000 झाडे लावली जाणार असून, वन विभागामार्फत 30,000 झाडे लावली जातील. म्हणजेच परिसरात नव्याने तब्बल 90,000 वृक्षांची लागवड होणार आहे.

अभयारण्य आणि भीमाशंकर मंदिरापासून प्रकल्प सुरक्षित अंतरावर!

धार्मिक आणि पर्यावरणीय स्थळांना कोणताही धोका नसल्याचे त्यांनी आकडेवारीनिशी स्पष्ट केले. हा प्रकल्प कर्जत तालुक्यात असून भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किलोमीटर लांब आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोनच्या (ESZ) पूर्णपणे बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात एकही झाड तोडण्यात आलेले नाही.

ज्योतिर्लिंग मंदिरापासून 20 किमी अंतर

हा प्रकल्प प्रसिद्ध भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या परिसरात कोणतेही काम प्रस्तावित नाही.

वर्षाला 40 लाख वाहनांइतके कार्बन उत्सर्जन टळणार

प्रकल्पामुळे पर्यावरणाला होणाऱ्या दीर्घकालीन फायद्यांची आकडेवारी मांडताना निकम म्हणाले, पीक अवर्समध्ये स्वच्छ वीज मिळणार असल्याने, इतकी वीज कोळशावर तयार करण्यासाठी लागणारे वर्षाला सुमारे ४.६ दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन पूर्णपणे टाळले जाईल. रस्त्यावरून धावणाऱ्या वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके घातक कार्बन उत्सर्जन होते, तितके उत्सर्जन या प्रकल्पामुळे रोखले जाणार आहे.

पाणी आणि खाणकामाची बचत

कोळसा प्रकल्पांसाठी लागणारे वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर (जे 4 लाख नागरिकांच्या वर्षभराच्या वापरासाठी पुरेसे असते) या प्रकल्पामुळे वाचणार आहे. याशिवाय औष्णिक प्रकल्पांतून तयार होणारी वर्षाला 1.6 दशलक्ष टन फ्लाय अ‍ॅश आणि 40 ते 50 हेक्टरवरील नवीन ओपन-कास्ट कोळसा खाणकाम या पर्यावरणपूरक प्रकल्पामुळे टळले आहे.

——————————————————————————————-

हेही वाचा…

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत मोठा गोंधळ: 8 मतपेट्यांना सील नसल्याचा मविआचा आक्षेप; मतमोजणी काही काळ थांबवली

राज्यभरातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या ५ जागांसाठी आज मतमोजणी होत असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. मात्र, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर आज सकाळी मोठा गोंधळ उडाला. मतमोजणी केंद्रात आलेल्या ८ मतपेट्यांना सील नसल्याचा गंभीर आक्षेप महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा जाधव यांनी घेतला. या आक्षेपामुळे आणि निर्माण झालेल्या गोंधळामुळे मतमोजणीची प्रक्रिया काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.