Headlines

डाव्यांचे आक्रमण; परतवून लावा:‘रास्वसंघा’चे कार्यकारिणी सदस्य श्यामजी हरकरे यांचे प्रतिपादन




देशात सध्या डाव्या (वामपंथी) विचारांच्या आक्रमणाचे नवे संकट घोंघावत आहे. त्यांना या देशाचा उत्कर्ष हवा नसून देश अपकर्षाच्या खाईत लोटण्याचे त्यांचे ध्येय आहे. त्यांना भारताला विश्वगुरु होऊ द्यायचे नाही. त्यामुळे देश, हिंदुत्व आणि धर्म-संस्कृती या त्रयीवर चालणारा आपला संघ विचार अधिक मजबूत व समाजाभिमुख करा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि माजी अ. भा. अधिकारी श्यामजी हरकरे यांनी केले. अमरावती महानगर शाखेचा श्री विजयादशमी उत्सव आज, रविवारी सायंकाळी येथील किरणनगर स्थित नरसम्मा महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. श्री सीडस् कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सी-डॅक या संगणक क्षेत्रातील नामांकित कंपनीचे माजी अधिकारी विनीत श्रीराव प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. हरकरे पुढे म्हणाले, देशाच्या वेगवेगळ्या भागात सध्या वेगवेगळी आंदोलने सुरु आहे. आंदोलन ‘नीट’ परीक्षेतील गोंधळाबाबत असले तरी त्यात शिक्षण हा विषय न आणता देशविघातक नारेबाजी केली जाते. देशातील स्वायत्त संस्थांच्या सुधारणांसाठी आंदोलन करतो आहोत, असे सांगून त्या आंदोलनांमध्येही असेच काहीसे होत आहे. या सर्व आंदोलनांच्या मागे अमेरिकेचा हात असून वेळोवेळी त्या देशाने त्यासाठी आर्थिक पाठबळ पुरवल्याचेही पुढे आले आहे. प्रारंभी महानगर संघचालक उल्हास बपोरीकर यांनी प्रास्ताविक केले. विजय शेलुकर यांनी प्रार्थना म्हटली. आकाश मानकर यांनी अमृत वचन केले. स्वप्नील गुंडे यांनी वैयक्तिक गीत गायले तर निखील किन्हीकर यांनी सांघिक गीत सादर केले. १९३२ मध्ये अमरावतीत पहिली शाखा उघडली ^प्रास्ताविकादरम्यान महानगर प्रमुख उल्हास बपोरीकर यांनी गेल्या १०० वर्षांचा लेखा-जोखा मांडला. अमरावतीबद्दल बोलताना ते म्हणाले, येथील पहिली संघ शाखा १९३२ मध्ये स्थापन झाली होती. जुन्या अमरावती शहरात अंबागेटच्या आतील ही शाखा विद्याधर गोखले चालवायचे. पुढे ते मुंबईमधून खासदारही झाले होते. – राष्ट्रसंतांचीही आठवण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *