Headlines

Sanjay Raut Writes To Amit Shah Seeking PMLA Probe In 500 Crore Case


मनोज जरांगे पाटील यांनी उघड केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असतानाच, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दोन पानांचे सविस्तर पत्र

.

‘भाजपकडून आता आंदोलनेही विकत घेण्याचा प्रयत्न’

संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “आतापर्यंत भाजपने खासदार, आमदार, राजकीय पक्ष आणि निवडणुका विकत घेतल्या, पण आता त्यांनी आंदोलनेही विकत घ्यायला सुरुवात केली आहे,” असा घणाघात त्यांनी केला आहे.

५०० कोटींचा व्यवहार आणि शिंदेंवर थेट आरोप

अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रात राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या २० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या आरोपांचा संदर्भ दिला आहे. राऊत यांनी पत्रात म्हटले आहे की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या कोअर टीममधील वरिष्ठ नेत्यांकडून ५०० कोटी रुपये घेतले आणि ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगे पाटील यांना दिले जाणार होते”. “२०२४ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणाचे आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी आणि जरांगे यांना गप्प करण्यासाठी हा व्यवहार झाल्याचा दावा ऑडिओ क्लिपमधून समोर आला आहे”.

‘पैसे गेले कुठे? ईडीने तात्काळ चौकशी करावी’

राऊत यांनी अमित शहांना थेट सवाल केला आहे की, “जर हे ५०० कोटी रुपये जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत, तर इतकी मोठी रक्कम नेमकी गेली कुठे?”. हा थेट मनी लाँडरिंगचा प्रकार असून, महाराष्ट्र पोलीस आणि ईडीने तात्काळ PMLA अंतर्गत गुन्हे दाखल करून या घोटाळ्यात सामील असणाऱ्यांना अटक करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

अनिल देशमुख प्रकरणाची करून दिली आठवण

राऊत यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले आहे. “मार्च २०२१ मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केवळ १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. कोणताही पुरावा नसताना ईडीने तत्परतेने कारवाई करत अनिल देशमुखांना अटक केली होती,” याची आठवण राऊत यांनी करून दिली. “त्या तुलनेत मनोज जरांगे यांनी केलेले आरोप अधिक गंभीर आहेत कारण इथे ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात स्पष्ट आणि नाकारता न येण्याजोगा पुरावा उपलब्ध आहे,” असा दावा राऊत यांनी केला आहे.

———————

हेही वाचा..

ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्याचा प्रयत्न: फडणवीस-शिंदेंनी तपास केला नाही तर जनता समजेल हे त्यांनीच घडवलं- मनोज जरांगे

पडद्यामागची सत्य परिस्थिती जनतेसमोर आल्यास सरकारची प्रतिमा मलिन होईल, या भीतीपोटी ही ऑडिओ क्लिप खोटी ठरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती समोर आणली पाहिजे, असे सांगत जर त्यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला नाही, तर हा कट त्यांनीच घडवून आणला होता, असा संदेश महाराष्ट्रातील जनतेमध्ये जाईल, असा गंभीर इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.