Headlines

कुस्तीच्या आखाड्यात यश सुरुडे यास सुवर्ण:राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी




कुर्डुवाडी-माढा, जिल्हा सोलापूर येथे झालेल्या महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावचा युवा मल्ल यश सुरुडे याने प्रतिस्पर्धी कौस्तुभ कुलकर्णी याच्यावर १३ विरुद्ध ५ अशा गुणांनी मात करत सुवर्णपदक पटकावले. या विजयामुळे यशला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे उभाडे गावासह संपूर्ण इगतपुरी तालुक्याची मान उंचावली आहे. कुर्डुवाडी-माढा येथे झालेल्या स्पर्धेत यशने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. उत्कृष्ट डावपेच, शारीरिक ताकद आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व निर्माण केले. प्रत्येक गुणासाठी झुंज देत यशने १३-५ अशी निर्णायक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. या कुस्तीचे कामकाज राष्ट्रीय पातळीवरील पंच भाऊसाहेब बिन्नर यांनी पाहिले. ग्रामीण भागातील मातीशी नाळ जोडलेल्या यशने मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी मिळवली आहे. त्याच्या विजयामुळे परिसरातील कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही यशने महाराष्ट्राचा झेंडा उंच फडकवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *