![]()
दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तब्बल ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच वेतन देण्याचा शब्द राज्य शासनाने पाळला असून, वेतनासाठी आवश्यक असणाऱ्या ३९१ कोटी २ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. निधी उपलब्ध झाल्यामुळे वेतनाचा मार्ग मोकळा झाला असून एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीचा निधी महिला सन्मान योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवासी सवलतींमुळे महामंडळावर येणाऱ्या आर्थिक भाराची भरपाई म्हणून, राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यातील सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी हा ३९१.०२ कोटी रुपयांचा निधी एसटी महामंडळाला वितरित केला आहे. दिवाळीपूर्वीच पगार खात्यात एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणपणे दर महिन्याच्या ७ ते १० तारखेच्या दरम्यान केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासूनच दिवाळी सुरू होत आहे. सणाच्या काळात कर्मचाऱ्यांची कोणतीही आर्थिक अडचण होऊ नये, यासाठी सणापूर्वीच पगार देण्याचे निर्देश परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले होते. त्यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. ‘कर्मचारी हेच महामंडळाचे खरे बळ’ या निर्णयावर समाधान व्यक्त करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “एसटी ही केवळ एक परिवहन सेवा नसून ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. अहोरात्र काम करणारे कर्मचारी हेच या महामंडळाचे खरे बळ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीचा सण आर्थिक तणावाविना आणि आनंदाने साजरा करता यावा, यासाठी आम्ही सणापूर्वी वेतन देण्याचा शब्द पाळला आहे. प्रशासनाने आता तातडीने वेतन वितरणाची प्रक्रिया पूर्ण करावी.” ———– हेही वाचा.. कर्जमाफी योजनेची 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांची चौथी यादी जाहीर: दुष्काळग्रस्तांना 5,000 रुपयांची अग्रीम मदत आणि फायनान्स कंपन्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश राज्यात दुष्काळाचे भीषण सावट असताना हवालदिल झालेल्या बळीराजासाठी राज्य सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ अंतर्गत पात्र शेतकरी लाभार्थ्यांची बहुप्रतिक्षित चौथी यादी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या चौथ्या यादीद्वारे राज्यातील तब्बल 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होणार असून, त्यांच्या कर्जमुक्तीसाठी सहकार विभागाने 4,000 कोटी रुपयांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सुपूर्द केला आहे. याशिवाय, दुष्काळग्रस्त भागातील सुमारे 1.50 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट प्रत्येकी 5,000 रुपयांची अग्रीम मदत याच आठवड्यात जमा करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. सविस्तर वाचा
Source link
एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीआधी गुड न्यूज:391 कोटींचा निधी मंजूर, 83 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा