Headlines

पूर्णेकर हत्या प्रकरण:29 दिवसांनंतर माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी, एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आंदोलनाचा प्रयत्न




उबाठा नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला २९ दिवस उलटूनही मुख्य सूत्रधारांचा छडा न लागल्याने ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. मंगळवारी या प्रकरणात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. एकीकडे माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांची ठाणे गुन्हे शाखेत ७ तास चौकशी करण्यात आली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ‘शुभ-दीप’ या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यासाठी निघालेल्या प्रदीप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असताना राम पूर्णेकर अत्यंत भावुक झाले आणि त्यांना रडू कोसळले. “माझे वडील गेलेत सर…’ असे म्हणत ते रिक्षात बसण्यास नकार देत होते. उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत अखेर त्यांना रिक्षात बसवून पोलिस ठाण्यात नेले. या वेळी राम पूर्णेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राजेंद्र शिंदे यांची ७ वेळा चौकशी ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मंगळवारी दुपारी १ वाजता माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळेत चौकशीसाठी हजर झाल्या. “मला चौकशीला बोलावल्यावर मी त्याला सामोरी जाईन, असे मी आधीच सांगितले होते. त्यानुसार मी आले असून पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आंदोलक उतरले रस्त्यावर पूर्णेकर कुटुंबासाठी मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले. ठाण्यातील पोलिस ठाण्यासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना नेते राजेंद्र शिंदे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेची मागणी केली. पूर्णेकर कुटुंबाने पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला. या वेळी उबाठा नेते राजन विचारे, केदार दिघे, शिवसैनिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *