![]()
आई-वडिलांच्या मृत्युयोगाची भीती दाखवून खरातने लाटले 8 कोटी रु.
आई-वडिलांना ‘मृत्युयोग’ असल्याची भीती दाखवून तब्बल पावणेनऊ कोटी रुपये उकळणाऱ्या भोंदू खरातचा एका उच्चशिक्षित सीएने (चार्टर्ड अकाउंटंट) ‘फिल्मी’ स्टाइलने भंडाफोड केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या सीएने भोंदूच्या फार्महाऊसवर थेट ‘कुक’च्या वेशात आपल
.
हवेतून काजू कतली आणि मृत्यूची भीती
ललित पोफळे (रा. वरळी, मुंबई) असे या तक्रारदार सीएचे नाव आहे. २०१७ मध्ये खरातने हवेतून काजू कतलीचा प्रसाद काढून पोफळे यांच्यावर अंधश्रद्धेचे जाळे टाकले. ‘कुक’ पेरून पर्दाफाश
आई-वडिलांना मृत्यूचा धोका असल्याचे सांगून खरातने कोट्यवधी रुपये उकळले
खरातने सीएला अवतार पूजा करायला लावून ४ कोटी २५ लाखांची रक्कम स्वत:च्या आणि त्याची पत्नी कल्पना यांच्या बँक खात्यात जमा करवून घेतली. तसेच त्रिवेंद्रमच्या किनाऱ्यावरील आणि वावी येथील दर्ग्यात पूजेच्या नावाखाली सीएकडून त्यांच्या वडिलांच्या नावाने आणखी २ कोटी ५३ लाख रुपये घेतले.
अंधश्रद्धेपोटी कोट्यवधी रुपये गमावल्यानंतर पोफळे यांना भोंदू खरातच्या हेतूंवर संशय आला. सत्य शोधण्यासाठी त्यांनी स्वतःच्या ड्रायव्हरच्या मदतीने एका व्यक्तीला खरातच्या फार्महाऊसवर ‘कुक’ म्हणून नोकरीला लावले. या गुप्तहेर ‘कुक’ने फार्महाऊसवर भोंदूबाबाच्या अश्लील पार्ट्या व उच्चभ्रू महिलांसोबतच्या अनैतिक संबंधांची बित्तंबातमी पोफळे यांना दिली. पुरावे हाती लागताच पोफळे यांनी इतर फसवणूक झालेल्या नागरिकांच्या मदतीने भालेराव नावाच्या व्यक्तीमार्फत थेट शिर्डी पोलिसांना माहिती देत भोंदूचा पर्दाफाश केला.