Headlines

कीर्तनातून संतविचारांचे प्रबोधन करण्याचे डॉ. उल्हासदादा पवार यांचे आवाहन:आळंदीतील 17 व्या संतसाहित्य नांदी संमेलनाचे उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते उद्घाटन




आळंदीतील १७व्या संतसाहित्य नांदी संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते झाले. कीर्तनातून संतविचारांचे शुद्धपणे प्रबोधन व्हावे, असे मत संमेलनाध्यक्ष डॉ. उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणे, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले. १००व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ‘साहित्य निष्ठांची मांदियाळी’ हे संतसाहित्य नांदी संमेलन झाले. डॉ. पवार म्हणाले, वारकरी संप्रदाय संतांच्या विचारांचा वारसा जपणारा ज्ञानसमृद्ध संप्रदाय आहे. तो समता, बंधुभाव आणि शिस्तीची परंपरा जपतो. भाषा ही संस्कृतीची खरी वाहक आहे. मराठी भाषा जोपासल्यास अभिजात लोकसंस्कृती टिकेल. समाजात वितंडवादाऐवजी संतसाहित्यावर संवाद आणि परिसंवाद व्हावेत. माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते म्हणाले, संतत्वाची साथ सोडल्यामुळे समाजाचे नैतिक अधःपतन झाले आहे. दांभिकता आणि अंधश्रद्धा बाजूला सारून संतविचारांवर आधारित एकात्म महाराष्ट्र घडवावा. ६९व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि माईर्स विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही झाले. मसापचे कोशाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, राजन लाखे, प्रभाकर ओव्हाळ, बबनराव कुऱ्हाडे, आळंदी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा सुजाता तापकीर, नगरसेविका पूजा घुंडरे आणि माईर्स एमआयटी संस्थेच्या महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे उपस्थित होते. उषाताई मंगेशकर म्हणाल्या, संत ज्ञानेश्वरांच्या ‘भावार्थदीपिके’तील ओव्यांना हृदयनाथजींनी संगीत दिले आणि लतादीदींनी त्या आपल्या स्वरातून घराघरांत पोहोचवल्या. माउलींच्या या भूमीत डॉ. कराड यांनी निस्वार्थ भावनेतून केलेले कार्य कौतुकास्पद आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *