Headlines

कॉसमॉस बँकेच्या मदतीसाठी प्रदीप खेडकर यांचा सत्कार:अमरावतीतील प्रयास विशेष शाळेत सपत्नीक गौरव; डॉ. सरिता कडू यांचाही सत्कार




अमरावतीतील मनोविकास स्पेशल चिल्ड्रेन एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित प्रयास विशेष शाळेत कॉसमॉस बँकेचे निवृत्त शाखाधिकारी प्रदीप खेडकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाळेला फर्निचर आणि साहित्य मिळवून देण्यासाठी त्यांनी भूमिका बजावली होती. शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फर्निचर आणि इतर साहित्याची गरज होती. कॉसमॉस बँकेने सामाजिक बांधिलकीतून शाळेला फर्निचर आणि विविध साहित्य भेट दिले. पुण्यातील बँकेच्या मुख्य कार्यालयाकडून हा उपक्रम राबवण्यात तत्कालीन स्थानिक शाखाधिकारी खेडकर यांनी मदत केली होती. संस्थेचे मार्गदर्शक आणि कान, नाक व घसा तज्ज्ञ डॉ. बबनराव बेलसरे यांच्या हस्ते खेडकर यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. मुख्याध्यापिका अर्चना ठवळे, रेखा धांडे, ज्योती बोरकर आणि अनिकेत राठोड यांनी त्यांना भेटवस्तू दिली. कार्यक्रमाला डॉ. शशी चौधरी, डॉ. श्रीकांत देशमुख, संस्थेचे अध्यक्ष विनायक कडू, युथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष अतुल भारद्वाज, सचिव दिनेश नरसू आणि डॉ. गजानन रत्नपारखी उपस्थित होते. अभियंता प्रकाश धोटे, रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष गाताडे, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ कर्मचारी पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण मोहोड, कॉसमॉस बँकेच्या रचना जाजू, सई चौधरी, जयश्री गांवडे, डॉ. सोनाली पामपट्टीवार, गिरीश इंगळे, महेंद्र शेंद्रे, संतोष पिंप्रीकर आणि विशाल पिंपळकरही उपस्थित होते. युथ हॉस्टेलचे विजय पांडे, पल्लवी मुंजे, सचिन पेठ, माया अंबाडकर, पियुष जोशी, दीनानाथ नवाथे आणि महेश बेलसरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर कार्यक्रमाला आले होते. कार्यक्रमात डॉ. सरिता कडू यांना ‘राज्यस्तरीय लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२६’ जाहीर झाल्याबद्दल प्रा. रेखा बेलसरे आणि डॉ. सुनीता चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रयास विशेष शाळेचे विशेष शिक्षक नाना आमले आणि विवेक केने यांचाही समर्पित सेवेसाठी मनोविकास संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *