![]()
शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण प्रचंड तापलेले असतानाच, राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ठाणे पोलिस आयुक्तांचीही भेट घेतली होती. राम पूर्णेकर यांच्या दाव्यानुसार, या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांच्यासोबत असलेल्या दोन तरुणांना कापूरबावडी पोलिसांनी शोधून पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी या तरुणांना नग्न करून त्यांची अंतर्वस्त्रे काढली आणि ती एकमेकांच्या डोक्यावर घातली, असा संतापजनक आरोप पूर्णेकर यांनी केला आहे. या प्रकाराविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी राम पूर्णेकर स्वतः या तरुणांना सोबत घेऊन कापूरबावडी पोलिस ठाण्यात गेले होते. काल दुपारी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पोलिसांनी पूर्णेकर यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतले. मात्र, कापूरबावडी पोलिस ठाण्यात या तरुणांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. याच प्रकरणी शुक्रवारी राम पूर्णेकर हे आपल्या वकिलासह आणि अत्याचार झालेल्या तरुणांना सोबत घेऊन कापूरबावडी पोलिस ठाण्यात आले होते. अंतर्वस्त्रे काढून एकमेकांच्या डोक्यावर घातली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राम पूर्णेकर यांनी पोलिसांवर खळबळजनक आरोप केले. त्यांनी सांगितले की, काल पोलिसांनी अर्जुन पुंदरे आणि त्याच्यासोबतच्या इतर काही तरुणांना ताब्यात घेतले होते. कापूरबावडी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर या तरुणांना विवस्त्र करण्यात आले. त्यांची अंतर्वस्त्रे काढून ती एकमेकांच्या डोक्यावर घालण्यात आल्याचा आरोप अर्जुन पुंदरे याने केला आहे. तसेच, पोलिसांनी सूर्यफूल तेल लावून या तरुणांच्या शरीराच्या नाजूक भागावर अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक दावाही राम पूर्णेकर यांनी केला आहे. ‘एका तरुणांच्या पार्श्वभगात पोलिसांनी बोट घातले’ तरुणांनी केलेल्या आरोपानुसार, आम्हाला कापुरबावडी पोलिस ठाण्यात पकडून आणले. फक्त सांगण्यात आले होते की एका व्यक्तीचा फोटो दाखवला जाईल. त्याला ओळखता का याची तपासणी करायची आहे. त्यानंतर पोलिस ठाण्यात आम्हाला नेले. तिथे गेल्यावर अश्लील प्रकारे आम्हाला टॉर्चर केले. कपडे काढली. त्यानंतर साध्या कपड्यातील व्यक्ती यायचे आणि आम्हाला पट्ट्याने मारहाण करायचे. तसेच राम पूर्णेकरांनी सांगितले की, एका तरुणाच्या पार्श्वभागात पोलिसांनी बोट घातली. लघवीच्या जागेवर सूर्यफूल तेल लावले, असा गंभीर आरोप पूर्णेकरांनी केला आहे. तसेच आमच्या वकिलांनी पोलिसांना पत्र दिले आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. राम पूर्णेकर या तरुणांना घेऊन पोलिस ठाण्यात आले, तेव्हा तिथे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या कथित अत्याचाराच्या या आरोपांमुळे पूर्णेकर समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पूर्णेकर यांच्याकडून करण्यात आली आहे. आता या गंभीर आरोपांवर ठाणे पोलिसांकडून काही स्पष्टीकरण दिले जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Source link
'अंतर्वस्त्रे काढून डोक्यावर घातली, नाजूक भागांवर मारहाण':राम पूर्णेकरांचे ठाणे पोलिसांवर अमानुष अत्याचाराचे गंभीर आरोप