Headlines

सोयगाव शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ:वडिलांसह मुलाला चावा




शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव गंभीर बनला असून, गुरुवारी (भारत पेट्रोलपंपासमोर कुत्र्यांच्या कळपाने बाप-लेकावर हल्ला चढवला. या घटनेत दुचाकी घसरून वडील जखमी झाले, तर दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या पायाचा कुत्र्याने लचका तोडला. या घटनेमुळे सोयगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दीपक सखाराम घन हे गुरुवारी दुपारी आपला दोन वर्षांचा मुलगा शिवांश याला दुचाकीवरून घेऊन बसस्थानकावरून घराकडे जात होते. शेंदुर्णी बायपास रस्त्यावरील भारत पेट्रोलपंपासमोर २० ते २५ मोकाट कुत्र्यांच्या कळपाने अचानक त्यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. कुत्रे चाकात आल्याने दुचाकी घसरून दोघेही खाली पडले. त्याच क्षणी कुत्र्यांनी चिमुकल्या शिवांशवर हल्ला करून त्याच्या पायाचा लचका तोडला. या घटनेत दीपक घन हेही जखमी झाले. प्रसंगावधान राखून राजू दुतोंडे आणि विशाल काळे यांच्यासह उपस्थितांनी कुत्र्यांना हाकलले. दरम्यान, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संभाजीराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मोकाट श्वानांमुळे सोयगाव शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *